• Fri. Jun 5th, 2026

कासारी गावात आढळला बिबट्या. गाव व गावा लगतच्या खेड्यात भीतीचे वातावरण.

Bybaba maske

Dec 17, 2023

कासारी गावात आढळला बिबट्या. गाव व गावा लगतच्या खेड्यात भीतीचे वातावरण.

रोखठोक न्युज वार्ताहर 

 केज तालुक्यातील कासारी शिवारात आज सायंकाळी सव्वा सात वाजेच्या दरम्यान गायरान परिसरात एक बिबट्या नागरिकांना दिसला आणि गावात एकच हल्लाकोळ झाला. गावातील सर्व लोक सतर्क झाले असून वन विभागाच्या अधिकाऱ्यांन कडे संपर्कसाधलाआहे. परंतू त्याचा संपर्क होऊ शकला नाही.                 तसं कासारी गाव पाहायला गेलं तर केज तालुक्यात येत. मात्र त्याला धारूर तालुका पोलीस स्टेशन आहे. कासारीचा संपूर्ण परिसर हा धारूर पोलीस ठाण्याअंतर्गत आहे. वन विभाग धारूर या ठिकाणी असून वन विभागाने आता लक्ष देण्याची गरज आहे. कासारी गावातील अनेक लोक वस्ती तांड्यावर राहतात. पशुधन आहे त्याचबरोबर पिकांना पाणी देण्यासाठी अनेक शेतकरी शेतात असतात कारण मध्यरात्री लाईट येत असल्याने बोर विद्युत विहिरीतले मोटर चालू करण्यासाठी शेतकरी मध्यरात्रीच शेतात असतो. त्यामुळे कासारी गावातील शेतकऱ्यांच्या मनामध्ये सध्या तरी भीती निर्माण झालेली आहे. वेळीच शासन प्रशासनाने पावले उचलली गेली पाहिजेत. याच परिसरात रानडुक्कर व हरण देखील मोठ्या प्रमाणावर आहेत. त्या मुळेच वनविभागाने या वर  कारवाई करावी अशी मागणी कासारीकर व आजू बाजूच्या खेड्या पाड्यातून होत आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!