वंचित बहुजन आघाडीची नियोजन व आढावा बैठक जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे यांच्या नेतृत्वात मोठ्या उत्साहात पार पडली.
रोखठोक न्युज वार्ताहर
काल दिनांक 17 डिसेंबर 2023 रोजी शासकीय विश्रामगृह अंबाजोगाई या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी बीड जिल्हा (पूर्व)ची नियोजन व आढावा बैठक वंचित बहुजन आघाडी बीड जिल्हा (पूर्व)चे जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीला बीड जिल्हा पूर्वचे जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी, तसेच परळी, अंबाजोगाई, केज, धारूर, वडवणी, येथील शहर व तालुका कार्यकारणीतील सर्व पदाधिकारी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या जाधव काकू, छायाताई हिरवे, सुचिताताई सोनवणे, तृतीयपंथी प्रतिनिधी नंदिनी यांची उपस्थिती होती. या बैठकीत पक्ष मजबूत करण्यासाठी संघटनात्मक बांधणी, शाखांचे उद्घाटन, सर्कल बांधणी, तसेच पक्षाने दिनांक 25 डिसेंबर 2023 रोजी स्त्रीमुक्ती दिन साजरा करण्यासंदर्भात दिलेले आदेश अशा अनेक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीत नांदडी गावचे वंचित बहुजन आघाडीचे नवनिर्वाचित सरपंच आबासाहेब देशमुख, नुकताच वंचित बहुजन आघाडी प्रवेश केलेले रहीम मौलाना, रशीद शेख, व इतर जिल्हा पदाधिकारी यांनी पक्ष मजबुती करण्यासाठी त्यांची वैयक्तिक मत मांडली. ही बैठकी यशस्वी करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी बीड (पूर्व) जिल्हा उपाध्यक्ष धम्मानंद कासारे, वंचित बहुजन आघाडी बीड (पूर्व) जिल्हा उपाध्यक्ष अमोल पौळे, वंचित बहुजन आघाडी बीड (पूर्व) बीड जिल्हा प्रसिद्धीप्रमुख पवन जोगदंड, रवी शिरसाठ वंचित बहुजन आघाडी अंबाजोगाई शहर अध्यक्ष गोविंद मस्के, शहर महासचिव नितीन सरवदे, सतीश सोनवणे उमेश शिंदे आणि इतर कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले या बैठकीला पदाधिकाऱ्यांच्या सोबतच केज,परळी अंंबाजोगाई तालुक्यातील बरेच कार्यकर्तेही उपस्थित होते
