दुरवस्था झालेल्या उद्यानांच्य्या विकासासाठी अंबाजोगाईसाठी २० तर केजसाठी १९ कोटींचा निधी मंजूर.
केज शहरात उद्यानच नाही तर मग १९ कोटी कुठे खर्च करणार?
शहरात अस्तित्वात नसलेल्या उद्यानाला नगरपंचायत नाहरकत देते का नाही हे बघावे लागेल?
रोखठोक न्युज वार्ताहर
अंबाजोगाई, केज शहरातील उद्यानांची दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे उद्यानांच्या विकासाकरिता शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मंगळवारी (दि.१२) निधीची मागणी केली होती. त्यानंतर दोनच दिवसात अंबाजोगाईसाठी २० तर केजसाठी १९ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
केज शहरात अस्तित्वात नसलेल्या उद्यानाच्या दुरूस्ती साठी १९ कोटींचा निधी आणल्याने नागरिक अश्चर्य चकीत आहेत.अंबाजोगाई शहरात तरी योगेश्वरी देवी च्या नावाने उद्यान आहे पण केज मध्ये डिपी प्लॅन मध्ये तरी उद्यान आहे का नाही ही एक शाशंकता आहे?जर डिपी प्लॅन मध्ये जागा आरक्षीत असेल तर ती अस्तित्वात असेल का नाही हे संशोधनाचा विषय होऊ शकतो.कारण अश्यया किती तरी जागा भुमाफीयाने हडप केल्या आहेत.तरी ही केज शहरात लहान मुले,वयस्कर नागरिका साठी व जनते साठी उद्यानाची( पार्क)ची खूप अवश्यकता आहे तरी केज नगरपंचायत ने यांचा सदुपयोग करावा असे नागरिकात चर्चा आहे.शहरात अस्तित्वात नसलेल्या उद्यानाला नगरपंचायत नाहरकत देते का नाही हे बघावे लागेल.
तरी ही अंबाजोगाई, केज शहरातील उद्यानांची दुरवस्था झालेली आहे. या उद्यानांच्या विकासासाठी अमृत २.० योजनेतून अंबाजोगाई शहरासाठी २० व केज शहरासाठी १९ असा एकूण ३९ कोटी रूपयांचा निधी द्यावा अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. त्यावेळी
मुख्यमंत्र्यांनी तातडीने निधी उपलब्ध करून दिला जाईल असे आश्वस्त केले आणि दोनच दिवसात तब्बल ३९ कोटींचा निधी उपलब्ध करुन दिला. हा निधी मिळाल्याने उद्यानांच्या विकासाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. दरम्यान, निधी दिल्याबद्दल जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.
