• Fri. Apr 24th, 2026

चिखलबीड जिवाचीवाडी लव्हरी कानडीमाळी केज सोनिजवळा धनेगाव ते धाराशिव रस्त्याचे काम बोगस.     हाताने रस्ता उखडू लागला. अभियंत्यां वर कारवाई ची मागणी.

Bybaba maske

Dec 30, 2023

चिखलबीड जिवाचीवाडी लव्हरी कानडीमाळी केज सोनिजवळा धनेगाव ते धाराशिव रस्त्याचे काम बोगस.

    हाताने रस्ता उखडू लागला.

अभियंत्यां वर कारवाई ची मागणी.

 

रोखठोक न्युज वार्ताहर 

सार्वजनिक बांधकामविभाग,अंबाजोगाई. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील चिखलबीड जिवाचीवाडी लव्हरी कानडीमाळी केज सोनिजवळा धनेगाव ते धाराशिव जिल्हा सरहद रस्त्याची किमी. ९६/५०० ते १०४/०० मध्ये सुधारणा करणे प्रजिमा-१८ (एकूण लांबी-७.५ किमी.)

प्रशासकिय मान्यता – महाराष्ट्र शासन सा.बां.वि.शा.नि.क्र.पीएलएन-२०२०/

सी.आर. (१५९३)/नि.-३ दि.२७.०२.२०२० अन्वये रु-४००.०० लक्ष. कार्यारंभ आदेश क्र.-ब-१/६४७५ दि.२९.१०.२०२२

कंत्राटदाराचे नाव – मे. सिध्देश्वर कन्स्ट्रक्शन कंपनी, धाराशिव

कार्यान्वयीन यंत्रणा – कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग,अंबाजोगाई या आदेशानुसार दि.24/12/2023 रोजी ४ कोटी कामाचे भूमिपूजन आमदार नमिताताई मुंदडा यांच्या हस्ते पार पडले होते त्यानंतर उस्मानाबाद स्थित सिद्धेश्वर कन्स्ट्रक्शन उस्मानाबाद यांनी सदरील रस्त्याचे काम चालू केले असून अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असून त्या भागातील नागरिकांनी व्हिडीओ करून या कमाची गुणवत्ता दाखवली असून काम किती निकृष्ट पद्धतीत केले जात आहे हे व्हिडीओ च्या माध्यमातून सोशल मीडियावर टाकले आहे.रस्ता ना कुठे खोदला आहे किंवा साफसफाई केली आहे.जमिनीच्या मातीच्या थरावरच खडी मिश्रित निकृष्ट डांबर अंतरले जात आहे.ते हाताने सुद्धा उखडले जात आहे.४ कोटी रूपयांचा नुसता दिखावा करून रस्ता थातूरमातूर केला जात आहे.असे जर रस्ते बनवले तर हे रस्ते १५ दिवस ही टिकणार नाहीत तर मग निधी आणून असे बोगस रस्ते करण्याचा अट्टहास का? असे जनता विचारत आहे.जर आमदार मोहदयाने तळमळीने निधी आणला असेल तर गुत्तेदार काम व्यवस्थित करतो का नाही हे सुद्धा पहाणे गरजेच आहे.कारण गुत्तेदार खोटे काम करतो आणि नाव आमदार मोहदयाच खराब होत.तरी या कडे तात्काळ लक्ष देऊन रस्ता पुन्हा बनवून देण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.या रस्त्यावर जे अभियंते काम करून घेत आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून रोखठोक न्युज शी बोलताना केली.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!