• Mon. Aug 24th, 2026

बोअरवेल गाडीला वीज तारांचां स्पर्श होऊन दोन मजूरचा जागीच मृत्यु.

Bybaba maske

Jan 30, 2024

बोअरवेल गाडीला वीज तारांचां स्पर्श होऊन दोन मजूरचा जागीच मृत्यु.

रोखठोक न्युज वार्ताहर 

परळी तालुक्यातील वाघबेट येथे आज दुपारी पाण्याचा बोर पाडण्यासाठी ओरिसा राज्यातील मजुरांसह बोरवेल मशीन घेऊन सहा जण गेले होते. या गावातील बोरवेल पाडण्याचे काम संपल्यानंतर बोरवेलची ही गाडी घेऊन परळी शहराकडे ते परत येत होते.

परळी तालुक्यातील वाघबेट येथे दुपारी १२ वा. सुमारास एक अपघात घडला आहे. बोअरवेल पाडण्यासाठी गेलेल्या गाडीचा वीज वाहक तारांशी संपर्क अचानक करंट उतरून या बोअरच्या गाडीवर बसलेल्या दोन मजूर मृत्युमुखी पडले आहेत.

 तर अन्य दोन मजूर जखमी झाले आहेत. मृत्यू पावलेल्या मजुरांचे मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहेत. दोन जखमींवर येथेच उपचार सुरू आहेत.

रस्त्यात वीजवाहक तारांना या गाडीचा संपर्क झाला.

संपूर्ण लोखंडी पाईप असलेल्या या गाडीत कंरट उतरला. या गाडीमध्ये एकूण सहा मजूर बसलेले होते. त्यापैकी करंट लागून दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोन जण जळून जखमी झाले आहेत. बोरवेल वरील हे सर्व मजूर ओडिसा राज्यातील असून गोविंदा धवन सिंग व संदीप असे मयत झालेल्या व्यक्तींचे नाव आहे. अन्य दोन मजूर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

दरम्यान या वाहनाच्या चालकाच्या निष्काळजीपणाने हा थरारक व दुर्दैवी अपघात घडला असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!