• Sat. Apr 18th, 2026

अजीत पवार गटाला धक्का; बजरंग सोनवणे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सदस्यत्वाचा राजीनामा.

Bybaba maske

Mar 20, 2024

अजीत पवार गटाला धक्का; बजरंग सोनवणे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सदस्यत्वाचा राजीनामा.

रोखठोक न्युज वार्ताहर 

बीड- महाविकास आघाडी कडून बीड लोकसभा निवडणुकीचा उमेदवार म्हणून ज्यांचं नाव चर्चेत आहे. त्या बजरंग सोनवणे यांनी अखेर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा त्यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर पोस्ट शेअर केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बजरंग सोनवणे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे म्हणजेच मविआ चे उमेदवार असू शकतात ? असा तर्क वितर्क लावला जात होता. आणि आज अखेर त्यांनी राजीनामा दिला असून आज ते राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान बजरंग सोनवणे यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार प्रीतम मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्याचबरोबर ते राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष देखील राहिलेले आहेत.. जिल्हा परिषदचे सभापती म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे. यासह कारखानदारी मध्ये देखील त्यांचं नाव आहे. यामुळं त्यांचं नाव विविध क्षेत्रात देखील घेतलं जातं. त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाला सोडचिट्टी दिलेल्या, बजरंग सोनवणे यांच्या उमेदवारीवर आज निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!