निवडणूक आयोगाचा दणका बसल्या शिवाय नायबतहसीलदार लक्ष्मण धस यांची बदली होणार नाही का?
पाच वर्ष जिल्ह्य़ात सेवा मग बदली का नाही?
रोखठोक न्युज वार्ताहर
केज तहसील कार्यालयातील नायबतहसीलदार लक्ष्मण धस यांना केज तहसील कार्यालयात त्यांचा कार्यकाळा पुर्ण होऊन जास्त वर्ष झाले पण त्यांची बदली होत नाही.तसेच ते केज तालुक्याचे भुमीपुत्र असून बीड जिल्ह्यातील रहिवासी आहेत तरी ही त्यांची बदली होत नाही? ते केज तहसील ला नायबतहसीलदार असल्या कारणाने कोणत्या ही कारणाणे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष निवडणूक कार्यात त्यांचा सहभाग येतोच तरी ही त्यांची बदली प्रशासनाने का केली नाही हा प्रश्न उपस्थित रहातो.याच आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल यांचा बदली कालावधी पुर्ण होऊनही बदली केली नसल्या कारणाने सरकारवर ताशेरे वोढले होते त्या नंतर तात्काळ त्याची व त्यांच्या दोन सहकार्याची बदली झाली तसीच प्रक्रीया लक्ष्मण धस यांच्या बाबतीत होयला पाहिजे म्हणून प्रशासन वाट बघत आहे का?
कारण लक्ष्मण धस हे नियमानुसार त्यांचा बदली कालावधी पुर्ण करुन(Over due) मुदत संपली आहे .तरी बदली का होत नाही?
हे न उलगडणारे कोडे.निवडणूक आयोग सोडवावे लागेल का?
असा प्रश्न आता नागरिकात चर्चेला जात आहे.
