• Fri. Jun 5th, 2026

निवडणूक आचारसंहिता काटेकोर पालन करणार-उपजिल्हाधिकारी दीपक वंजाळे.

Bybaba maske

Mar 21, 2024

निवडणूक आचारसंहिता काटेकोर पालन करणार-उपजिल्हाधिकारी दीपक वंजाळे.

रोखठोक न्युज वार्ताहर

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक२०२४ संदर्भाने बुधवार रोजी तहसील कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी उपविभागीय अधिकारी अंबाजोगाई तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दीपक वंजाळे म्हणाले की, निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव आहे निवडणूक प्रक्रिया कालावधीत नागरिकांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे असे आवाहन त्यांनी पत्रकार परिषदेत केले.केज तहसीलचे तहसीलदार अभिजीत जगताप, अंबाजोगाई तहसील कार्यालयाचे तहसीलदार विलास तरंगे गटविकास अधिकारी श्रीमती दिवाने यांची उपस्थिती होती.निवडणूक कालावधीत खर्च नियोजनाचे मर्यादा उल्लंघन होणार नाही या करिता सर्वांनी सजग राहावे. मतदारसंघात काही ठिकाणी मतदारांकरिता मतदान केंद्रावर सेल्फी पॉईंट तयार करण्यात येणारआहेत.मतदारसंघात ४१५ मतदान केंद्र उभा करण्यात येतील.४० क्षेञीय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.आचारसंहिता भंग निरीक्षणाबाबत व कारवाईसाठी पथक तीन टीम तयार करण्यात आल्या आहेत.निवडणुकी साठी दोन हजाराहुन अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात येत आहेत.मतदान केंद्रावर मतदान यंत्र घेऊन ये जा करण्यासाठी महामंडळ बस व खाजगी वाहनांची व्यवस्था करण्यात येणार आहे.मतदान केंद्रावरचोख बंदोबस्त ठेवण्यात येईल.केज मतदार संघात दोन संवेदनशील केंद्र आहेत.मतदान केंद्रावरून वेब कास्टिंग द्वारे मतदान प्रक्रिया पाहता येईल

चौकट-

मतदान केंद्र केवळ महिला अधिकारी,दिव्यांग कर्मचारी यांच्या नियोजना खाली काही केंद्र उभारणीचा प्रयोग निवडणूक निर्णय अधिकारी करणार आहेत.

लोकशाही सुदृढ करण्यासठी मताचा टक्का वाढावा यासाठी जनजागृतीसाठी पथनाट्ये केली जाणार आहेत.आचारसंहिता भंगाचे गैरप्रकार घडत असतील त्यावेळी नागरिकांनी तात्काळ सिव्हिजल ॲपद्वारे तक्रार करावी.मतदारांनी आपले नाव मतदार यादीत असल्याची आपल्या मोबाईलद्वारे ऑनलाईन पाहणी करून खात्री करून घ्यावी.निवडणूक आयोगाच्या अनेक मार्गदर्शक सूचना विषयक माहिती देण्यात आली.लोकोत्सवातमोठ्या संख्येने मतदारांनी सहभागी होऊन मतदानाचा टक्का वाढवावा असे आवाहन त्यांनी केले.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!