कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याचे वारसदार श्रीमंत शाहू छत्रपती व युवराज संभाजीराजे छत्रपती यांचे आशिर्वाद घेऊन बीडच्या लोकसभा रणांगणात उतरले बंजरग सोनवणे.
रोखठोक न्युज वार्ताहर
बीड लोकसभेची निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षातून उमेदवारी भेटल्यानंतर बंजरग सोनवणे यांनी सरळ कोल्हापूर गाटत राजश्री शाहूमहाराज यांचे वंशज छत्रपती शाहूमहाराज व छत्रपती संभाजीमहाराज यांचे आशीर्वाद घेऊन ते या निवडणूकीच्या रणांगणात उतरत आहेत.
कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याचे वारसदार श्रीमंत शाहू छत्रपती व युवराज संभाजीराजे छत्रपती यांचे आशिर्वाद घेऊन बीडच्या लोकसभा रणांगणात उतरत आहे. छत्रपती घराण्याकडून मिळालेली ऊर्जा घेवून मी आज माझ्या बीड जिल्ह्यात प्रवेश करत आहे. जनतेच्या दरबारात या शेतकरीपुत्राला यावेळी नक्की न्याय मिळणार याचा मला विश्वास आहे. असे रोखठोक न्युज शी बोलतांना
बजरंग सोनवणे यांनी प्रतिक्रिया दिली.
आज ते बीड जिल्ह्य़ात येत असुन त्यांचा दौरा पुढील प्रमाणे असणार आहे.
महाविकास आघाडीचे बीड लोकसभा मतदारसंघाचे अधीकृत उमेदवार श्री. बजरंग मनोहर सोनवणे यांचा दि. ५ एप्रिल २०२४ रोजीचा नियोजित भेटी दौरा ——
धानोरा, ता. आष्टी – स. ०९.००
कडा, ता. आष्टी – स. ९.३०
धामणगाव, आष्टी. – स. १०.००
अमळनेर, ता. पाटोदा- स. १०.३०
पिंपळवंडी, ता. पाटोदा – स. ११.००
डोंगरकिन्ही, ता. पाटोदा – स. ११.३०
श्री क्षेत्र नारायणगड, ता. बीड – १२.१५
साक्षाळपिंपरी, ता. बीड – दु. १.०० वा
मादळमोही, ता. गेवराई – दु.१.३०
पाडळसिंगी, ता. गेवराई – दु. १.४५
गेवराई – दु. २ वाजता ( राष्ट्रवादी कॅाग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाच्या गेवराई विधानसभा मतदारसंघाच्या नियोजित बैठकीस उपस्थिती)
तालखेड फाटा – ३.००
माजलगाव – दु. ४.००
तेलगाव, ता. धारुर – ५.००
धारुर – ५.३०
केज – ६ वाजता
