• Sun. Apr 26th, 2026

बनावट “हार्पिक” विकताना दोघांवर गुन्हे दाखल. केज येथील लक्ष्मी जनरल स्टोअर्स चा मालक “काकानी” खरा पुरवठादार.

Bybaba maske

Apr 5, 2024

बनावट “हार्पिक” विकताना दोघांवर गुन्हे दाखल.

केज येथील लक्ष्मी जनरल स्टोअर्स चा मालक “काकानी” खरा पुरवठादार.

रोखठोक न्युज वार्ताहर 

टॉयलेट क्लिनिंग उत्पादनात नामांकित ब्रॅण्ड असलेल्या ‘हार्पिक’ कंपनीच्या बनावट उत्पादनांची अंबाजोगाई शहरात विक्री करणाऱ्या विक्रेत्यावर आणि आणि त्याला माल पुरविणाऱ्या दुकानदारावर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शहर पोलीस ठाण्यात कॉपीराईट कायद्यान्वये गुन्हा नोंदवला. 

अधिक माहिती अशी की, अंबाजोगाईतील शासकीय विश्रामगृहालागत रोडवर एक व्यक्ती हार्पिक कंपनीची बनावट उत्पादने विकत असल्याची माहिती हार्पिक कंपनीने नेमलेल्या डिटेक्टीव्ह कंपनीला मिळाली होती. त्यामुळे सदर कंपनीचे अधिकारी रईसोद्दिन फैजोद्दिन इनामदार आणि सत्तार मुनाफ शेख यांनी अंबाजोगाई पोलिसात याबाबत अर्ज दिला. त्यानंतर या दोन्ही अधिकाऱ्यांसह एपीआय कांबळे, पोलीस कर्मचारी घोळवे, चादर, नागरगोजे यांनी बुधवारी (दि.०३) सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास विश्रामगृहालगत रोडर असलेल्या स्टोलवर छापा मारला. यावेळी जलाल मुन्ना शेख (रा. बाबा नगर, कळंब) हा हार्पिकचे बनावट उत्पादने विकताना आढळून आला. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्याच्याकडून २२ हजार २२० रुपयांचा बनावट मुद्द्माल हस्तगत केला आणि पोलिसांनी त्यास ताब्यात घेतल. चौकशीत त्याने सदरील माल केज शहरातील जिल्हा परिषद शाळे समोरच्या लक्ष्मी जनरल स्टोअर्समधून खरेदी केल्याचे सांगितले. याप्रकरणी रईसोद्दिन इनामदार यांच्या तक्रारीवरून जलाल शेख आणि लक्ष्मी जनरल स्टोर्सच्या मालकावर कॉपीराईट कायद्यान्वये अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!