मोदी लाटेत देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारामण पैसे नाहीत म्हणून निवडणूक लढवणार नाहीत.
शासकीय राजीनामा देऊन ज्योती मेटे लोकसभा लढवणार?
रोखठोक न्युज वार्ताहर
बीड लोकसभेची निवडणूक आता उत्कंठावर्धक स्थित आली आहे.
देशाच्या अर्थमंत्री असलेल्या निर्मला सितारामण यांनी कांही दिवसा पुर्वी माध्यमात मुलाखत देताना म्हणाल्या की माझ्या कडे निवडणूक लढविण्यास पैसे नाहीत म्हणून मी पक्षाला स्पष्ट सांगीतले की मी निवडणूक लढवणार नाही.
तर बीड जिल्ह्य़ात वेगळच चित्र पहायला भेटत आहे.सह निबंधक आयुक्त पदाचा राजीनामा देऊन ज्योती मेटे या निवडणूक लढवणारच याच्यावर ठाम आहेत.
ज्योती मेटे या शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख स्वर्गीय आमदार विनायक मेटे यांच्या पत्नी आहेत.ऐवढीच ओळख असलेल्या दोन गटात विभागलेल्या शिवसंग्राम पक्ष व विनायक मेटे यांच्या दुर्दैवी अपघाता नंतर सैरभैर झालेल्या कार्यकर्त्याच्या जिवावर हे धाडस अनाकलनीय आहे.
शिवसंग्राम पक्ष हा महायुतीत आहे,त्या अनुषंगानेच त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन उमेदवारी मागीतली पण त्यानी बीड विधानसभे साठी उभे रहा असे सुत्रा नुसार बातमी आहे.
त्यानंतर त्यांनी शरद पवार यांची भेट घेऊन उमेदवारी मागीतली या साठी त्यांनी तीन चार वेळेस शरद पवारांची भेट घेतल्याचे दिसून आले.शरद पवार यांनी त्यांचा शिवसंग्राम पक्ष राष्ट्रवादीत सामील करा मग बघू असे सांगीतल्याचे कळत, पण त्या नंतर ही त्यानी पत्रकार परिषदेत मी शरद पवार यांनी उमेदवारी दिली तर ठीक नाहीतर अपक्ष (शिवसंग्राम)कडून लढेल असे सांगीतले.
देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट असताना देशाचे अर्थमंत्री निवडणूक लढविण्यास सक्षम नसताना.ज्योती मेटे यांची निवडणूक लढविण्याच्या भुमीकेवर अश्चर्य व्यक्त केले जात आहे.
जर विनायक मेटे यांची सहानभुती किंवा मराठा आरक्षणाची लाटेवर स्वार होऊन आपण निवडून येऊ शकतो तर शरद पवार यांच्या कडून पैश्याने सक्षम व गेल्या निवडणुकीचा अनुभव असलेला मराठाच उमेदवार बजरंग सोनवणे हा दिला आहे.
तसेच वंचित बहुजन आघाडी कडुन ही मराठा नेतृत्व असलेले व मराठा अंदोलनात आरक्षण साठी अग्रेसर असलेले आशोक हिंगे यांना उमेदवारी भेटेल असा कयास आहे.मग या तीन मराठ्यात निवडणूक होणार व पंकजा मुंडे या सरळ मोठ्या मताधिक्य घेऊन निवडून येणार यात कुठलीच शंका रहाणार नाही.
पण यात ज्योती मेटे यांच्या उमेदवारीने जनतेत कुतूहल निर्माण झाले ऐवढे मात्र खरे?
