• Mon. Apr 27th, 2026

जिवाचीवाडी तलावातून अवैध पाणी उपसा चालुच…..  प्रशासनाच अपयश की अभय!

Bybaba maske

Apr 6, 2024

जिवाचीवाडी तलावातून अवैध पाणी उपसा चालुच…..

 प्रशासनाच अपयश की अभय!

रोखठोक न्युज वार्ताहर

केज,दि.4 : तालुक्याल जीवाचीवाडी येथील साठवण तलावात अनाधिकृत विद्युत पंप टाकून मोठ्या प्रमाणात चोरून पाणी उपसा होत असताना प्रशासनस मात्र बघ्याची भुमीका घेत आसल्यामुळे तलावातील अवैध पाणी उपसा रोखण्यास प्रशासनाला अपयश आले की प्रशासनाचे त्याला अभय आहे.या बद्दल पंचक्रोशीत उलट सुलट चर्चेला उधान आले आहे. 

…. जीवाचीवाडी येथील नारायण गोवर्धन चौरे यांनी दि.13/2/2024 रोजी केजचे तहसीलदार अभिजीत जगताप यांना लेखी निवेदन देऊन जीवाचीवाडी येथील साठवण तलावात किमान 200 विद्युत पंप हे अवैधरित्या पाणी उपसा करीत आसल्याचे कळविले होते.

यावेळी तहसीलदार अभिजीत जगताप यांनी त्याच दिवशी तलाठी व इतर कर्मचाऱ्यांसह साठवण तलावाला प्रत्यक्ष भेट देऊन स्वतः पाहाणी केली असता मोठ्या प्रमाणावर तलावात कृषीपंप टाकून पाणी उपसा होत असल्याचे त्यांनी प्रत्यक्ष पाहीले. ग्रामविकास अधिकारी महेंद्र मुंडे,तलाठी उत्तरेश्वर घुले ,मंडळ अधिकारी सुहास डोरले, अनिल लोंढे, जलसंपदा विभागाचे उप विभागीय अधिकारी, व कर्मचारी यांना तातडीने बोलाऊन अवैध पाणी उपसा करणारी मोटार व पाईप जप्त केले होते व कारवाई केली होती.परंतु स्थानिक लोकप्रतिनिधी व काही शेतकऱ्यांनी दोन दिवसाची वेळ मागून तूर्तास कारवाई थांबविण्याची विनंती केली होती. परंतु 50% शेतकऱ्यांनी विद्युत मोटर पंप साठवण तलावातून बाहेर काढून घरी घेऊन गेले होते. परंतु काही शेतक-यांनी तहसिलदार यांच्या आदेशाचे पालन न करता तलावातच विद्युत पंप ठेवून महावितरणच्या कर्मचाऱ्यांशी संगनमत करुन रात्रीच्या वेळी थ्री फेजची वीज पाळी नसताना चालु करून रात्रीच्या वेळी चोरून सर्रास पाणी उपसा होत असल्याने परिसरातील शेतकरी याची चर्चचा करीत आहेत. चोरून पाणी उपसा करणाऱ्या शेतकऱ्यांना अथय कोणाचे? प्रशासन कोणाच्या दबावाखाली आहे का? आसे प्रश्न निर्माण होत असुन प्रशासनाला अवैध पाणी उपसा रोखण्यात अपयश आल्याची चर्चा होत आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!