• Sat. Jul 19th, 2025

केजमध्ये रमेश गालफाडे घेणार जनसंवाद मेळावा ! मतदारसंघातील महिला-पुरुष मेळाव्यास प्रचंड प्रमाणात राहणार उपस्थित

Bybaba maske

Jul 26, 2024

केजमध्ये रमेश गालफाडे घेणार जनसंवाद मेळावा !

मतदारसंघातील महिला-पुरुष मेळाव्यास प्रचंड प्रमाणात राहणार उपस्थित

रोखठोक न्युज वार्ताहर 

ऑक्टोंबर महिन्यात विधानसभा निवडणूक होणार असून सर्वच उमेदवार तयारीला लागलेले आहे.रमेश गालफाडे यांनी केज विधानसभेची निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे.त्यांनी मतदारसंघामध्ये संपर्क वाढविण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू करून गावभेटीवर भर देण्याचे काम सुरू केले आहे. व सामान्य जनतेशी संवाद साधत आहे.यामुळे जनतेकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

येत्या ऑक्टोंबर महिन्यात विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुकळे जाणार असून त्या पार्श्वभूमीवर गालफाडे यांनी जनसंपर्क वाढवला आहे.गालफाडे यांनी मतदार संघात गावभेटीवर जोर लावला आहे.केज विधानसभेसाठी तिकीट मिळवण्यासाठी रमेश गालफाडे यांनी पूर्ण ताकद लावली असल्याचे समजले जाते.मुबई,पुणे येथे काही मोठ्या राजकीय नेत्यांची भेट घेऊन केज विधानसभा संदर्भात चर्चा केल्याची देखील मतदारसंघात जोरदार चर्चा सुरू आहे.रमेश गालफाडे गेल्या अनेक दिवसापासून केज-अंबाजोगाई मतदार संघात मतदार बांधवाच्या भेटी गाठी घेताना दिसत आहेत.निवढणूक लढवण्यासाठी गालफाडे सज्ज आहेत,त्यांना मतदार संघात ठिकठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत आहे.

रमेश गालफाडे यांनी मतदारसंघातील जनतेसाठी “जनसंवाद मेळावा’ दि.३० जुलै २०२४ रोजी मुक्ताई फंक्शन हॉल भवानी चौक केज येथे ठेवण्यात आला आहे.या जनसंवाद मेळाव्याची जयंत तयारी करण्यात येत आहे. या मेळाव्यासाठी मतदारसंघातील जनतेनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन रमेश गालफाडे मित्र परिवाराकडून करण्यात आले आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!