• Sat. Apr 18th, 2026

केज तालुक्यातील मनरेगा अंतर्गत विहीरी तसेच गायगोठा अनुदान तात्काळ द्यावे. अन्यथा के.पं.स.समोर आत्मदहन करणार – रोहन गलांडे पाटील

Bybaba maske

Aug 8, 2024

केज तालुक्यातील मनरेगा अंतर्गत विहीरी तसेच गायगोठा अनुदान तात्काळ द्यावे.

अन्यथा के.पं.स.समोर आत्मदहन करणार – रोहन गलांडे पाटील 

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज तालुक्यातील प्रेत्येक ग्रामपंचायत अंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच मनरेगाच्या माध्यमातून खोदलेल्या शेतकऱ्यांचे वयक्तीक लाभार्थ्यांचे सिंचन विहीर खोदण्यासाठीचे ४ लाख रुपये अनुदान व गायगोटा योजनेचे ७८ हजार अशा दोन्ही योजनेचे शासनाकडून निधी मागवून लवकरात लवकर लाभार्थी यांना रक्कम मिळावी व तात्काळ शासनाने द्यावी जर तात्काळ रक्कम देण्यात आली नाही तर केज पंचायत समिती समोर आत्मदहन करणार आहे असा इशारा शासनाला निवेदनाद्वारे अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघ महाराष्ट्र राज्य केज तालुकाध्यक्ष रोहन गलांडे पाटील यांनी दिला आहे.

या विषयी निवेदनाद्वारे सविस्तर वृत्त असे की महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच मनरेगाच्या माध्यमातून केज तालुक्यातील लाभार्थी शेतकऱ्यांचे वयक्तीक लाभार्थ्यांचे शासन कागदोपत्री प्रक्रिया ज्या लाभार्थांची पुर्ण झाली आहे व केज तालुक्यातील ग्रामपंचायत अंतर्गत ज्या लाभार्थ्यांनी मनरेगा जलसिंचन विहीर योजनेचे लाभार्थी आहेत लाभार्थांन कडील शासन प्रक्रिया पूर्ण झालेली आहे परंतु अद्याप पर्यंत लाभार्थ्यांना मनरेगा योजने अंतर्गत झालेल्या विहीरीचा ऐकही रुपये रक्कम देण्यात आलेली नाही चार – पाच महिने झाले केज तालुक्यातील विहीर लाभार्थी शेतकरी मनरेगा विहीर योजने अंतर्गत ४ लाख अनुदान मिळणार म्हणून व्याजाचे पैसे काढून विहीरीला खर्च करून विहीर खोदल्या आहेत परंतु शासना कडुन महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत खोदलेल्या विहीरीची ४ लाख रुपये रक्कमेतील ऐक रुपये शेतकऱ्यांच्या , लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेला नाही तरी शासनाने केज तालुक्यातील प्रेत्येक ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत खोदलेल्या विहीरीचे ४ लाख अनुदान व गायगोठा योजनेचे ७८ हजार शासनाकडून निधी मागवून लवकरात लवकर लाभार्थी यांना रक्कम मिळावी,अनुदान शासन कागदोपत्री प्रीक्रीया तात्काळ पुर्ण करुन लाभार्थ्यांच्या बँक खात्यात तात्काळ जमा करावे अन्यथा अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघ केज तालुकाध्यक्ष रोहन गलांडे पाटील केज पंचायत समिती समोर आत्मदहन करण्याचा शासनाला इशारा रोहन गलांडे यांनी निवेदनाद्वारे दीला आहे.

चौकट:-

जलसिंचन विहीर लाभार्थी यांची बीले पास होऊन दोन महीने झाले आहेत तरी शासनाकडून निधी आलेला नाही.ग्राम रोजगार सेवक संघटना केज तालुका सचिव अनिल घोडके.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!