• Sat. Apr 18th, 2026

रेल्वे अपघातात एका मेंढपाळासह २२ मेंढ्या व २ जनावरे ठार

Bybaba maske

Aug 11, 2024

रेल्वे अपघातात एका मेंढपाळासह २२ मेंढ्या व २ जनावरे ठार

रोखठोक न्युज वार्ताहर 

परळी : परळी शहरापासुन जवळ असलेल्या मलकापुर शिवारात रेल्वेखाली आल्याने एका मेंढपाळासह २२ मेंढ्या व २ जनावरे ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. हा अपघात आज रविवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, परळी शहरातील धनगर गल्ली भागातील मेंढपाळ मधुकर सरवदे व मुंजा डोणे रा. उखळी ह.मु. परळी हे दोघे आज रेल्वे पटरीने मेंढ्या चारण्यासाठी गेले असता रविवार दि १९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास परळी-हैद्राबाद रेल्वे पटरीच्या कडेने जात असताना मलकापुर शिवारात अचानक समोरुन आलेल्या मालगाडीने मेंढ्या, दोन जनावरांना चिरडले. दोन्ही बाजुने डोंगर असल्याने बचावासाठी वेळच मिळाला नसल्याने मेंढपाळ मुंजा डोणे हे देखील को दुर्घटनेत सापडुन ठार झाले. या दुर्घटनेत सरवदे यांच्या २२ मेंढ्या व २ जनावरे मृत्युमुखी पडले आहेत. ह्या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!