• Wed. Apr 29th, 2026

विकासनिधी आणून आ. नमिता मुंदडा यांनी मतदार संघातील देवस्थानाचा केला कायापालट

Bybaba maske

Nov 3, 2024

विकासनिधी आणून आ. नमिता मुंदडा यांनी मतदार संघातील देवस्थानाचा केला कायापालट

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज मतदारसंघात आ. नमिता मुंदडा यांनी विविध विकास कामांसोबतच या भागातील जनतेची श्रद्धास्थाने असलेल्या विविध देवस्थानांच्या मंदिरांचाही विकास करण्याचे विशेष कार्य केले आहे. यासाठी जवळपास आकरा कोटींचा निधी त्यासाठी त्यांनी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती समाज माध्यमावरून देण्यात आली.

यासंदर्भात पुढे नमूद केले की, राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर केज मतदार विकासकामांची अगदी रेलचेल झाली आहे. मागील दोन वर्षात या मतदारसंघात विविध ठिकाणी रस्ते, वीज, पाणी यासाठी मोठा विकासनिधी आणण्यात

त्यांना यश आलेले दिसत आहे. केवळ रस्ते लाईट पाणीच नव्हे तर हजारो लोकांची श्रद्धास्थाने असलेल्या विविध मठ ब मंदिरांच्या विकासाकडे आपले लक्ष केंद्रित केले आहे. वर्षभरात त्यांनी १६ देवस्थानांच्या विकासासाठी पर्यटन विकास व तीर्थक्षेत्र विकास निधी अंतर्गत ११ कोटींच्या आसपासचा निधी खेचून आणण्यात यश मिळवले आहे. यात प्रामुख्याने पर्यटन विकास निधी अंतर्गत नेकनूर येथील बंकटस्वामी संस्थानसाठी ७० लाख रुपयांचा कीर्तन मंडप, विडा येथील शिवरामपुरी मठ संस्थान साठी ५० लक्ष रुपयांचा सभामंडप, बरपगाव येथील शिवरामपुरी मठसंस्थानसाठी १ कोटी १० लक्ष रुपयांचा सभामंडप, आडस येथील

आडकेश्वर महादेव मंदिरासाठी २५ लक्ष, आडस येथील हनुमान मंदिरासाठी २५ लक्ष, आवसगाव येथील श्रीराम मंदिरासाठी ५० लक्ष रुपये, युसुफवडगाव येथील श्रीराम मंदिरासाठी ५० लक्ष रुपये, वाघेबाभूळगाव येथील वाघेश्वरी देवी मंदिरासाठी ५० लक्ष रुपये, रामेश्वरवाडी (हंगेवाडी) येथील महादेव मंदिरासाठी २५ लक्ष रुपये, सासुरा येथील एकनाथ महाराज समाधी मंदिरासाठी २५ लक्ष रुपये, नंदुरघाट येथील तळ्याची आई देवस्थानसाठी ४० लक्ष रुपये, धनेगाव येथील मेसाईदेवी मंदिरासाठी ५० लक्ष, केज येथील भवानी आई मंदिरासाठी २५ लक्ष, 

 दहिफळ बडमाऊली देवस्थानसाठी ५० लक्ष रुपये तर तीर्थक्षेत्र विकास निधी अंतर्गत कुंबेफळ येथील सिद्धिविनायक मंदिरासाठी २ कोटी रुपये, दहिफळ बडमाऊली येथील देवस्थानसाठी २ कोटी रुपये असा निधी मागील दोन ते तीन महिन्यांपूर्वी मंजूर झाला होता. यातून काही ठिकाणी सभामंडप, किचनशेड, पालखी हॉल, पेव्हर ब्लॉक, व सुशोभीकरण अशी विविध कामे होणार आहेत. आ नमिता मुंदडा यांनी विशेष लक्ष घातल्याने विविध श्रद्धास्थानांचा होणारा कायापालट लक्षवेधी ठरला असल्याचे नमूद करण्यात आले.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!