• Wed. Apr 29th, 2026

अंबाजोगाई नगरपरिषदेत राजकिशोर मोदी यांनी केलेला भ्रष्टाचार मुंदडा यांनी बाहेर काढला म्हणून विरोध. 

Bybaba maske

Nov 6, 2024

अंबाजोगाई नगरपरिषदेत राजकिशोर मोदी यांनी केलेला भ्रष्टाचार मुंदडा यांनी बाहेर काढला म्हणून विरोध. 

रोखठोक न्युज वार्ताहर 

अंबाजोगाई नगरपरिषदेत राजकिशोर मोदी यांनी प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे गेल्या कित्येक वर्षांपासून नगरपरिषद आपल्याच ताब्यात ठेवून एक कलमी भ्रष्टाचार तर केलाच पण शहराचा विकास केला नाही शहरात सर्वत्र बकाल करून टाकला.

विकासाने झपाटलेल्या मुंदडा यांना हे पटले नाही व त्यांनी भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला व शहरातील रस्ते, नाली,यांच्यावर प्रश्न निर्माण करून त्यांनी आमदार फंडातून किंवा शासनाच्या इतर योजनेंतर्गत रस्त्याचे जाळे उभे केले.मंडीत कधीही होऊ शकनारा सिमेंट काँक्रिट चा रस्ता बनवला. शहरातील रस्ते चारपदरी बनवले त्यामुळेच मित्र पक्ष असताना सुद्धा राजकिशोर मोदी हे मुंदडा यांना विरोध करत आहेत व केज विधानसभेच्या निवडणुकीत विरोध गेले आहेत पण खरे म्हणजे त्यांना नगरपरिषदेच्या चाव्या पुन्हा आपल्या कडे पाहिजे म्हणून विरोध आहे ते त्या साठीच आज मुंदडा यांना विरोध करत आहेत पण विकासाच्या जोरावर आमदार नमिताताई मुंदडा यांनाच जनता निवडून देईल तेही तितकेच खरे आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!