वाढदिवसाच्या भेटीवर नविन राजकीय रणनीती तयार होत आहे का?
आमदार नमिता मुंदडा यांची अंजली घाडगे यांच्या घरी भेट.
राशप पक्षात कुठेतरी अंजली घाडगे या नाराज दिसत होत्या.
रोखठोक न्युज वार्ताहर
केज मतरसंघात जस जशी मतदान जवळ येत आहे तसे राजकीय गणित सुटायला लागले आहेत आज अंजली घाडगे यांचा वाढदिवस पण सकाळीच आमदार नमिता मुंदडा यांनी अंजली घाडगे यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसानिमित्त भेट घेऊन सत्कार केला आणि चर्चेला बळ मिळाले.
अंजली घाडगे या राशप कडून विधानसभे साठी इच्छुक होत्या व त्यांनी पक्षात जाहीर प्रवेश करून उमेदवारीच्या शर्यतीत व प्रचारात ही पुढे होत्या पण आचानक पृथ्वीराज साठे यांना उमेदवारी भेटली तरी पण नाराज न होता अंजली घाडगे या राशपचा प्रचार करत होत्या पण अचानक आपण निवडणूक लढवणारच म्हणून रिंगणात उतरलेल्या माजी आमदार संगिता ठोंबरे यांनी युटर्न घेत उमेदवारी वापस घेतली व राशप( पृथ्वीराज साठे)यांना पांठीबा दिला तसेच राशप मध्ये प्रवेश न करता ही त्याना महाराष्ट्रच उपाध्यक्ष पद देण्यात आले.व प्रचाराच्या बॅनर वर सुद्धा अंजलीताई यांचा फोटो कार्यकर्त्याच्या रेषेत लावण्यात आला त्या मुळे अंजली घाडगे या कुठे तरी नाराज चलत होत्या त्यात आज आमदार नमिता मुंदडा यांनी भेट घेतल्याने कुठे तरी नाराज असलेल्या अंजलीताई, नमिताताई यांना पाठींबा देतात का हे बघण्या सारखे असेल त्यामुळे अंजली घाडगे यांनी बांधलेला एक गठ्ठा मतदार नमिता मुंदडा कडे वळून त्या पुन्हा कणखर होतील असे चित्र आहे.यावर लवकर अंजली घाडगे खुलासा करतीलच.
