रमेश(तात्या)गालफाडे यांचे ग्रामदैवतांचे अशिर्वाद घेऊन स्वतःच्याच गावातून सुरू केला प्रचार.
.
रोखठोक न्युज वार्ताहर
केज विधानसभा मतदार संघाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार श्री.रमेश तात्या गालफाडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ शुक्रवार दि. ८ नोव्हेंबर रोजी केज तालुक्यातील साळेगाव या त्यांची जन्मभुमी आहे येथून करण्यात आली. हनुमान मंदिर,संत भगवान बाबा मंदिर येथे नारळ फोडून व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबडेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून, पीर बाबा दर्गा येथे चादर चढवून प्रचाराला सुरवात केली.दि.२० नोव्हेंबर ला रेल्वे इंजिन या चिन्हावर मतदान करून रमेश तात्या गालफाडे यांना विधानसभेत पाठवून इतिहास रचण्याचे आवाहन केज विधानसभा मतदार संघातील उपस्थित नागरिकांना केले.तसेच केजचा नाभुतो ना भविष्य असा विकास करू असे आश्वासन दिले व हे दिलेले आश्वासन सत्यात आणू असे वचन दिले.
यावेळी गावकरी बांधवांनी त्यांना निवडुन आणण्यासाठी आशिर्वाद असल्याचे सांगितले.
