• Wed. Apr 29th, 2026

वाल्मिक कराडला अटक करा, धनंजय मुडेंचे मंत्रीपद काढा संतोष देशमुख प्रकरणात धाकट्या बंधूंची उच्च न्यायालयात याचिका. वाल्मीक कराड आज पुणे सीआयडी कार्यालयात शरण येणार?

Bybaba maske

Dec 31, 2024

वाल्मिक कराडला अटक करा, धनंजय मुडेंचे मंत्रीपद काढा

संतोष देशमुख प्रकरणात धाकट्या बंधूंची उच्च न्यायालयात याचिका.

वाल्मीक कराड आज पुणे सीआयडी कार्यालयात शरण येणार?

रोखठोक न्युज वार्ताहर 

बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहेत. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेले वाल्मिक कराड हे मास्टरमाइंड असल्याचा आरोप केला जात आहे. आता संतोष देशमुख हत्या प्रकरणी उच्च न्यायालयात क्रिमिनल रेट याचिका दाखल करण्यात आली आहे. औरंगाबाद खंडपीठ येथे संतोष देशमुख यांचे धाकटे बंधू धनंजय देशमुख यांनी वकील ड. शोमितकुमार व्ही. साळुंके यांच्याद्वारे पुढील तपासाबाबत न्यायालयाने योग्य तो आदेश देत तपासाला दिशा देण्याबाबत याचिका दाखल केली आहे. यामध्ये वाल्मिक कराडला अटक करून प्रकरणाचा छडा लागेपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रीमंडळातून बाजुला ठेवा अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. तसेच याचीके नुसार धनंजय मुंडे, वाल्मीक कराड यांच्यातील मैत्रीचे दाखले देणारी दीडशे छायाचित्र दोघांच्या ही अधिकृत समाज माध्यमावर उपलब्ध आहेत.याशिवाय विधीमंडळात भाषणे आधार म्हणून उपलब्ध असल्याचे याचिकेत नमुद केले आहेत.

या याचिकेच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या नेटवर्कचे सर्व पाळेमुळे, राजकीय लागेबांधे तथा जिल्हा प्रशासनात होणारा राजकीय हस्तक्षेप व संघटित गुन्हेगारीला मिळणारा राजकीय वरदहस्त तथा हस्तक्षेप कमी व्हावा यांबाबत ठोस कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्य सचिव गृह मंत्रालय(राज्य शासन) व पोलीस प्रमुख यांना द्यावे, अशा मागण्या या क्रिमिनल रेट याचिकेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या आहेत.

याचिकेतील मागण्या

१. मयत सरपंच यांचे ९ डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या झाल्यानंतर देखील 

आजपर्यंत सर्व गुन्हेगारांना अटक झालेली नाही, ही गंभीर बाब आहे. याची कोर्टाने दखल घेत योग्य तो आदेश पारित करावा.

२. या घटनेचा मास्टरमाइंड ज्याचे नाव पुरवणी जवाबामध्ये दिलेले आहे. ज्याच्यावर यापूर्वी खंडणीचा गुन्हा दाखल आहे त मास्टरमाईंड म्हणजे वाल्मिक कराड याच्या अटकेसंदर्भात योग्य ती पावले उचलून वाल्मिक कराडवर चेललर कायदा, हत्येचा कलमानुसार एफ.आय.आर. तात्काळ दाखल करावी व पुढील तपास करावा.

३. बीड जिल्ह्यात यापूर्वीच्या अनेक प्रकरणी गुन्हेगारी विश्वाला मिळणारी राजकीय रसद, मदत तथा हस्तक्षेप याला कारणीभूत असणारे महाराष्ट्र शासनातील कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांना मंत्रीपदावर तात्काळ हटवत वरील संपूर्ण तपास हा निष्पक्ष व्हावा, त्यात कुठलाही राजकीय हस्तक्षेप असू नये. मंत्री धनंजय मुंडे व त्यांचे निकटवर्ती वाल्मिक कराड यांचे भूतकाळातील निकटवर्तीपणा, सहचर्य व लागेबांधे यांचा सखोल तपास करून याप्रकरणी तपास यंत्रणेने योग्य तो अहवाल सादर करावा अशा मागण्या याचिकेत करण्यात आल्या आहेत.

तर सुत्राच्या माहितीनुसार वाल्मिक कराड हे आज पुणे येथील सीआयडी च्या कार्यालयात शरण येतील असे सांगण्यात येत आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!