• Wed. Apr 29th, 2026

वाल्मिक कराडचा 14 दिवसाची पोलीस कोठडी; कोर्टात काय घडलं? ऐनवेळेस सरकारी वकील का बदलले?

Bybaba maske

Jan 1, 2025

वाल्मिक कराडचा 14 दिवसाची पोलीस कोठडी; कोर्टात काय घडलं?

ऐनवेळेस सरकारी वकील का बदलले?

रोखठोक न्युज वार्ताहर 

बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी सीआयडी तपासाला प्रचंड वेग आला आहे. या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड हा आज स्वत:हून पुण्याच्या सीआयडी कार्यालयात सरेंडर झाला. यानंतर नियमानुसार आरोपी वाल्मिक कराड याचं मेडिकल करण्यात आलं. त्यानंतर त्याला तातडीने बीडच्या केज कोर्टात आज रात्री उशिरा हजर करण्यात आलं.त्या आगोदर सरकारी वकील म्हणून एस एस देशपांडे हे दिले पण त्यांनी ऐनवेळेस  नकार दिला मग शासनाने सरकारकडून माजलगाव कोर्टातील सरकारी वकील जितेंद्र शिंदे यांची नियुक्ती केली.

 यावेळी आरोपीच्या रिमांडबाबत सुनावणी झाली. यावेळी सरकारी वकील जे. बी. शिंदे यांनी वाल्मिक कराडला 15 दिवसांची पोलीस कोठडी देण्याचा जोरदार युक्तिवाद केला. तर वाल्मिक कराड सीआयडीला शरण आले आहेत. मग जामीन मिळायला हवा, असा युक्तिवाद कराडचे वकील अशोक कवडे यांनी केला आहे. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाने वाल्मिक कराडला 14 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

रात्री 10 वाजेनंतर केजच्या कोर्टात दोन्ही बाजूच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. हा युक्तिवाद ऐकण्यासाठी कोर्टाच्या बाहेर कराड समर्थक आणि विरोधकांची तुफान गर्दी झाली होती. या पार्श्वभूमीवर कोर्ट परिसरात प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रात्री 11 वाजून 20 मिनिटांनी दोन्ही बाजूचा युक्तिवाद संपला. त्यानंतर कोर्टाने हा मोठा निर्णय दिला आहे. सीआयडीने 15 दिवसाची कोठडी मागितली होती. पण कोर्टाने 14 दिवसाची कोठडी दिली आहे. सीआयडीचं हे मोठं यश असल्याचं सांगितलं जात आहे.

सरकारी वकील युक्तिवाद

हत्येचा मुख्य आरोपी सुदर्शन घुले फरार आहे. त्यामुळे कराडची कोठडी महत्त्वाची आहे.

कराडच्या कोठडीशिवाय घुलेचा शोध घेणं कठीण आहे.

हत्या आणि खंडणीच्या गुन्ह्यात कराडचा सहभाग आहे का हे तपासायचे आहे.

मोबाईलवरचं संभाषण हे कराडचंच आहे का हे तपासायचं आहे.

तपासासाठी कराडला 15 दिवसांची पोलीस कोठडी द्या

संतोष देशमुख हत्येत वाल्मिक कराडचा हात आहे का? हे तपासायचं आहे.

सुदर्शन घुले हा वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून काम करायचा.

वाल्मिक कराडने आणखी काही गुन्हे करून दहशत पसरवली आहे.

काम बंद करू, हातपाय तोडू अशी धमकी सुदर्शन घुलेने दिली होती

कराडचे वकील अशोक कवडे यांचा युक्तिवाद

फक्त खंडणी प्रकरणाचा आरोप आहे

कराडा हा गरीब सामाजिक कार्यकर्ता आहे

कराडांना या प्रकरणात जाणूबुजून अडकवलं जात आहे.

राजकीय द्वेषापोटी अडकवण्याचा प्रयत्न

2 कोटीची खंडणी मागितल्याचा आरोप आहे, त्यातील किती पैसे दिले हे साांगा

2 कोटींची खंडणी मागितली हा फक्त आरोप आहे

आवाजाचे नमूने द्यायला तयार आहोत, पण कोठडी नको

कराड सरेंडर झाले, आता जामीन द्या

मीडिया ट्रायल पाहून कोर्टाने निर्णय घेऊ नये

कराडला न्यायालयीन कोठडी द्यावी

सर्व पेपर तुमच्याकडे आहे, तुम्ही तपास करा. 308 हे कलम चुकीच्या पद्धतीने लावलं जात आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!