युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात चार जणाविरुद्ध ॲट्रॉसिटी ॲक्ट अनुसार गुन्हा दाखल
रोखठोक न्युज वार्ताहर
केज तालुक्यातील बनसारोळा येथील चार जणाविरुद्ध युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी ॲक्ट अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, पुनम सुधाकर जोगदंड वय ३९ वर्षे व्यवसाय मजुरी रा. बनसारोळा ता.केज जि.बीड येथील रहिवाशी आहेत. पुनम जोगदंड त्यांचे पती सुधाकर जोगदंड, त्यांचा मुलगा संतोष व सून शिवानी असे मिळून त्यांचे कुटुंब वरील ठिकाणी राहत असून शेती करून त्यांच्या कुटुंबाची उपजीविका भागवत आहेत.
दिनांक २९ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ८-३० वा. सुमारास पुनम जोगदंड या त्यांच्या घरी स्वयंपाक करत असताना त्यांच्या गावातील भारत बलभीम धायगुडे हा त्यांच्या घरासमोर लोखंडी गज घेऊन आला व पुनम जोगदंड यांना म्हणाला की, काल तुझ्या मुलाने माझ्या मुलाची शूटिंग कशासाठी काढली असे म्हणून पुनम जोगदंड यांना शिवीगाळ करू लागला. पुनम जोगदंड या भारत यास म्हणले की, काल झाला तो विषय संपला आज त्यावर काही बोलू नकोस व शिवीगाळ करू नकोस असे म्हणल्या असता त्यांच्या पाठीमागून नितीन भारत धायगुडे हा हातामध्ये कुऱ्हाड व पोपट भारत धायगुडे हा त्याच्या हातामध्ये कोयता घेऊन व भारत धायगुडे याची पत्नी शोभा ही तिच्या हातामध्ये लाकडी काटी घेऊन आली व शिवीगाळ करू लागले तेव्हा पुनम जोगदंड त्यांना काल झाला तो विषय संपला आज कशाला शिवीगाळ करता असे म्हणाले असता.
भारत यानी पुनम जोगदंड यांच्या डाव्या पायाच्या मांडीवर त्याच्या हातामधील लोखंडी राॅडने मारहाण केली. यावेळी पूनम जोगदंड या खाली पडल्या असता पोपट यानी त्याच्या हातामधील कोयता त्यांच्या डाव्या हाताच्या मनगटा जवळ व डोक्यावर मारून जखमी केले.
तेवढ्यात पूनम जोगदंड यांचा मुलगा व पती हे भांडणाच्या आवाजाने बाहेरून घरी आले. व भांडणाची सोडवा-सोडव करू लागले तेव्हा माझे पत्ती यांना नितीन धायगुडे यानी लोखंडे राॅडने त्यांच्या डाव्या हातावर मारून हात फॅक्चर केला व शोभा धायगुडे हिने पुनम यांच्या पतीच्या पाठीत काठीने मारहाण केली. पुनम जोगदंड यांचा मुलगा संतोष हा भांडणे सोडवण्यासाठी मध्ये आला असता त्याला नितीन यांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. त्यांना आम्ही मातंग समाजाचे आहोत हे माहीत असताना ये मांगटयांनो तुमची लायकी आहे काय असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे असे पुनम जोगदंड यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
म्हणून दिनांक २९ डिसेंबर २०२४ रोजी युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात भारत बलभीम धायगुडे, शोभा भारत धायगुडे,नितीन भारत धायगुडे,पोपट भारत धायगुडे वरील सर्व रा.बनसारोळा ता.केज जि.बीड आहेत वरील चौघाजणा विरुद्ध गु.र.नं.२९६/२०२४ अधिनियम भारतीय न्याय संहिता(बी एन एस),२०२३ कलम ११८(१), ११७(२), ११८(२), ११५(२), ३५२,३५१(२), ३(५), अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) धिनियम, १९८९ कलम ३(१) (r), ३(१) (s), ३(२)(va), ३(२), ३(v) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपाधीक्षक कमलेश मीना हे करत आहेत.
