• Tue. Jul 28th, 2026

ग्रामसेवक लाच घेताना एसीबीच्या ताब्यात. मंजूर घरकुल कागदपत्रासाठी मागितली ग्रामसेवकांने लाच.

Bybaba maske

Sep 19, 2025

ग्रामसेवक लाच घेताना एसीबीच्या ताब्यात.

मंजूर घरकुल कागदपत्रासाठी मागितली ग्रामसेवकांने लाच.

रोखठोक न्यूज वार्ताहर 

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बीडच्या पथकाने ग्रामपंचायत अधिकाऱ्यास लाच मागणीप्रकरणी रंगेहात पकडले आहे. ग्रामपंचायत कार्यालय, केकत सारणी, ता.केज, जि.बीड येथे कार्यरत असलेले ग्रामपंचायत अधिकारी गंगाधर सुरेश ठोंबरे (वय 44 वर्ष, रा.केकत सारणी, ता.कज, जि.बीड) यांनी ग्रामस्थांकडून अनुदानासंबंधी कागदपत्रे करण्यासाठी लाच म्हणून पाच हजार रुपयांची मागणी केली होती.

तक्रारदाराने ही बाब लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिल्यानंतर सापळा रचण्यात आला. 18 सप्टेंबर रोजी ठोंबरे यांनी प्रत्यक्षात 5,000 रुपयांची लाच मागितली. मात्र अखेरीस तडजोड म्हणून त्यांनी 4,000 रुपये रोख आणि पहिल्या टप्प्यात 2,000 रुपये घेण्याचे मान्य केले.

यानंतर 19 सप्टेंबर रोजी ठरल्याप्रमाणे गंगाधर ठोंबरे यांनी तक्रारदाराकडून 2,000 रुपयांची लाच स्वीकारताच त्यांना बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.ही कारवाई पोलिस निरीक्षक आनंदराव कडू यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!