• Sun. Jun 28th, 2026

केज घरकुल घोटाळा — भाग २ गरीबांच्या घराचे पैसे कोणाच्या खात्यात? यादीतून उघड झाले कोट्यवधींचे संशयास्पद व्यवहार

Bybaba maske

Feb 18, 2026

केज घरकुल घोटाळा — भाग २

गरीबांच्या घराचे पैसे कोणाच्या खात्यात? यादीतून उघड झाले कोट्यवधींचे संशयास्पद व्यवहार

रोखठोक न्यूज | विशेष प्रतिनिधी | केज

केज नगरपंचायत अंतर्गत राबविण्यात आलेल्या घरकुल योजनेत मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा संशय अधिक गडद झाला आहे. उपलब्ध अधिकृत व्यवहार यादीत घरकुल लाभार्थ्यांसाठी मंजूर झालेली रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यात न जाता विविध व्यक्ती, व्यावसायिक फर्म व नाव नमूद नसलेल्या खात्यांमध्ये वितरित झाल्याचे दिसून येते.

अनेक नोंदींमध्ये “अदाकर्ता घरकुल लाभार्थी नाही” असा स्पष्ट शेरा असूनही लाखो रुपयांची देयके करण्यात आली आहेत.

🔴 यादीतील ठळक व्यवहार

▶ वारंवार पैसे गेलेली नावे

भास्कर एकनाथ ससाणे

₹1,95,000 | ₹1,85,000 | ₹2,10,000 | ₹2,15,000 | ₹2,20,000 | ₹2,50,000 (अनेक व्यवहार)

न्यु सानाली ऑफसेट, केज

₹2,70,500 | ₹3,72,500 | ₹3,55,000

महालक्ष्मी ट्रेडर्स

₹4,52,390 | ₹3,95,808 | ₹2,89,300

गुरुकृपा ट्रेडर्स — ₹3,11,000

हरिओम ट्रेडर्स अँड फॅब्रिकेटर्स — ₹2,90,000 | ₹2,95,000

 मशिनरी / इलेक्ट्रिकल फर्मकडे निधी

माऊली मशिनरी — ₹3,70,080 | ₹3,72,480 | ₹3,79,680

बालाजी इलेक्ट्रिकल्स — ₹3,65,280 | ₹3,79,392 | ₹3,97,500

फ्रिडम मशिनरी स्टोअर्स — ₹2,92,600 | ₹3,80,254

छत्रपती अॅग्रोवर्क्स — ₹3,95,680 | ₹3,63,264

नाथानी केबल व इलेक्ट्रिकल व नाथानी केमिकल ₹3,75072/₹3,70 80

सचिन इलेक्ट्रॉनिक्स — ₹7,10,088 (यादीतील एकत्रित मोठी रक्कम)

सर्वाधिक धक्कादायक नोंदी

“बँक स्टेटमेंटमध्ये अदाकर्त्याचे नाव नमूद नाही”

अशा नोंदींवर अदा रक्कम — ₹2,10,000 | ₹3,47,808 | ₹3,40,800 | ₹3,46,080 | ₹3,55,776 | ₹3,60,576 | ₹3,96,500 | ₹3,94,500 | ₹2,58,720 | रूपय1,82,400 | ₹41,110 | 3,30,030

 संशय अधिक गडद का?

लाभार्थी नसल्याची नोंद असूनही पेमेंट

एकाच प्रकारच्या रकमेचे वारंवार व्यवहार

ठेकेदार/फर्म नावावर घरकुल निधी

नाव नसलेल्या खात्यांवर लाखो रुपयांची वर्गणी

 नागरिकांचा थेट सवाल

घरकुल योजनेचा पैसा गरीबांसाठी की पुरवठादारांसाठी?

लाभार्थी वंचित आणि निधी मात्र इतर खात्यांत — जबाबदार कोण?

 चौकशीची मागणी

संपूर्ण व्यवहाराचा आर्थिक ऑडिट, निधी ट्रेल तपास व संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आता तीव्र होत आहे.

baba maske

Related Post

केज तहसील कार्यालयात भिमराव मस्के यांचामृतदेह आणून आंदोलन; ‘खरे आरोपींवर गुन्हे दाखल करा’ची मागणी घरकुल घोटाळ्याच्या मानसिक तणावातून कर्मचाऱ्याचा मृत्यू? संतप्त नातेवाईकांचा तहसील कार्यालयात आक्रोश
केज घरकुल घोटाळ्याच्या छायेत आणखी एक बळी? मानसिक तणावात असलेल्या नगरपंचायत कर्मचारी भिमराव मस्के यांचे हृदयविकाराने मृत्यू; जबाबदार कोण?
भांडण सोडवायला गेला, पण मृत्यूच्या दाढेत ढकलला गेला!टाकळीतील तरुणावर चाकू हल्ला; उपचारादरम्यान मृत्यू, आरोपींच्या अटकेसाठी ग्रामस्थांचा रस्ता रोको

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!