• Sun. Apr 19th, 2026

नगरपंचायत घरकुल घोटाळा  घरकुल घोटाळा 2019–22 चा… पण नोटीस 2023 ला? सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर मोठा प्रश्नचिन्ह! चार वर्षे जनविकास- काँग्रेसचे सत्ताधारी झोपेत होती का? सत्ता असतानाच गैरप्रकार माहीत नव्हते की मुद्दाम दुर्लक्ष केले? नगरपंचायतच्या सत्ताधाऱ्यांना घोटाळा दिसला नाही की जाणीवपूर्वक डोळेझाक?

Bybaba maske

Feb 22, 2026

नगरपंचायत घरकुल घोटाळा 

घरकुल घोटाळा 2019–22 चा… पण नोटीस 2023 ला? सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर मोठा प्रश्नचिन्ह!

चार वर्षे जनविकास- काँग्रेसचे सत्ताधारी झोपेत होती का? सत्ता असतानाच गैरप्रकार माहीत नव्हते की मुद्दाम दुर्लक्ष केले?

नगरपंचायतच्या सत्ताधाऱ्यांना घोटाळा दिसला नाही की जाणीवपूर्वक डोळेझाक?

रोखठोक न्यूज | केज प्रतिनिधी

केज नगरपंचायत अंतर्गत प्रधानमंत्री आवास (घरकुल) योजनेतील कथित गैरप्रकारावरून आता राजकीय वातावरण तापू लागले आहे. धनंजय भगवानराव कुलकर्णी यांना नगरपंचायतीकडून दिनांक 28 ऑगस्ट 2023 रोजी नोटीस बजावण्यात आल्याचे समोर आले आहे. मात्र या नोटीसमुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

विशेष म्हणजे, ही नोटीस ज्या काळात देण्यात आली त्या वेळी केज नगरपंचायतीत जनविकास आघाडी व काँग्रेस यांची सत्ता होती. सध्याचे सत्ताधारी मात्र दावा करत आहेत की, 2019 ते 2022 या कालावधीत प्रशासकीय राजवटीत घरकुल योजनेत मोठा भ्रष्टाचार झाला.

मात्र मग प्रश्न असा निर्माण होतो की —

जर भ्रष्टाचार 2019 ते 2022 दरम्यान झाला होता,

तर त्याची माहिती सत्ताधाऱ्यांना नव्हती का?

आणि माहिती नव्हती तर चार वर्षे प्रशासन व लोकप्रतिनिधी काय करत होते?

 की त्या काळात सर्व काही माहीत असूनही मुद्दाम शांतता ठेवण्यात आली?

नगरपंचायतीने दिलेल्या नोटीसमध्ये घरकुल मंजूर असूनही बांधकाम सुरू न केल्याचा ठपका ठेवत सात दिवसांत काम सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र आता विरोधकांचा आरोप आहे की, खऱ्या घोटाळ्याकडून लक्ष विचलित करण्यासाठी निवडक लाभार्थ्यांना नोटीस देण्याचा प्रकार सुरू आहे.

सत्ता आली तेव्हा काही हजारात नगरपंचायत कडे पैशे होते असे पत्रकार परिषदेत सांगीतली गेले, मग सत्ताधारी जनविकास व काँग्रेस यांनी नगरपंचायत चा प्रशासकीय कारभार पडताळून पाहीला नाही का? गेल्या चार वर्षांत अंधळा कारभार कसा काय केला?

दरम्यान, नागरिकांमध्येही चर्चा सुरू झाली असून —

“चार वर्षे घरकुल घोटाळा दिसला नाही का? की आता राजकीय सोयीप्रमाणे आवाज उठवला जात आहे?” असा सवाल विचारला जात आहे.

घरकुल योजनेतील निधी, मंजुरी प्रक्रिया आणि लाभार्थी निवड याबाबत संपूर्ण चौकशी होणार का, की हा वाद केवळ आरोप-प्रत्यारोपांपुरताच मर्यादित राहणार — याकडे आता केजकरांचे लक्ष लागले आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!