• Sun. Jun 28th, 2026

जिल्हा परिषद शाळेची जागा हडप करण्याचा नगरपंचायतचा डाव मोडणर का? आमदार नमिता मुदंडा यांचे मुख्यमंत्रीांकडे थेट पत्र नगरपंचायतीच्या ठरावावर आक्षेप • शाळेची जागा शैक्षणिक कामासाठीच राखून ठेवण्याची ठाम मागणी

Bybaba maske

Feb 26, 2026

जिल्हा परिषद शाळेची ४ ऐकर जागा हडप करण्याचा नगरपंचायतचा डाव मोडणर का?

आमदार नमिता मुदंडा यांचे मुख्यमंत्रीांकडे थेट पत्र

नगरपंचायतीच्या ठरावावर आक्षेप • शाळेची जागा शैक्षणिक कामासाठीच राखून ठेवण्याची ठाम मागणी

रोखठोक न्यूज | केज प्रतिनिधी

केज येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या जागेबाबत सुरू असलेल्या वादाला आता राजकीय व प्रशासकीय स्तरावर मोठे वळण मिळाले असून, आमदार नमिता मुदंडा यांनी थेट मुख्यमंत्री यांना पत्र पाठवून शाळेची जागा अन्य कारणासाठी वापरण्याचा प्रयत्न थांबवण्याची मागणी केली आहे. त्यामुळे नगरपंचायतीमार्फत शाळेची ४ ऐकर जागा हडप करण्याचा डाव मोडनार का? अशी चर्चा शहरात सुरू झाली आहे.

सदर पत्रामध्ये नमूद केल्याप्रमाणे, केज येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळा सन १९५२ पासून कार्यरत असून हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य घडविणारी ही संस्था आहे. मात्र विद्यार्थ्यांची संख्या घटणे व शिक्षक नियुक्ती न झाल्यामुळे सध्या शाळेची अवस्था गंभीर झाली आहे. याच पार्श्वभूमीवर नगरपंचायत, केज यांनी शाळेची जागा अनुपयोगी असल्याचा ठराव करून ती इतर कारणासाठी वापरण्याचा प्रयत्न सुरू केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

आमदार मुदंडा यांनी आपल्या पत्रात स्पष्ट केले आहे की, शैक्षणिक उपयोगासाठी असलेली जागा इतर कामासाठी वापरणे हे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणारे ठरेल. त्यामुळे नगरपंचायतीचा संबंधित ठराव तात्काळ रद्द करून शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी आवश्यक सुविधा, निधी व शिक्षक नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

तसेच स्थानिक नागरिक, पालक व माजी विद्यार्थ्यांकडूनही शाळा पुन्हा सुरू करण्याची मागणी होत असून, ४०० हून अधिक माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या पुनरुज्जीवनासाठी पुढाकार घेतल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, या पत्रामुळे शाळेची जागा वाचणार का आणि प्रशासन आता कोणती भूमिका घेणार याकडे केज शहरासह संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

baba maske

Related Post

केज तहसील कार्यालयात भिमराव मस्के यांचामृतदेह आणून आंदोलन; ‘खरे आरोपींवर गुन्हे दाखल करा’ची मागणी घरकुल घोटाळ्याच्या मानसिक तणावातून कर्मचाऱ्याचा मृत्यू? संतप्त नातेवाईकांचा तहसील कार्यालयात आक्रोश
केज घरकुल घोटाळ्याच्या छायेत आणखी एक बळी? मानसिक तणावात असलेल्या नगरपंचायत कर्मचारी भिमराव मस्के यांचे हृदयविकाराने मृत्यू; जबाबदार कोण?
भांडण सोडवायला गेला, पण मृत्यूच्या दाढेत ढकलला गेला!टाकळीतील तरुणावर चाकू हल्ला; उपचारादरम्यान मृत्यू, आरोपींच्या अटकेसाठी ग्रामस्थांचा रस्ता रोको

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!