• Sun. Jun 28th, 2026

भाग-२ | नियुक्तीच्या आड कोणाचा आशीर्वाद? केज नगरपंचायतीतील संशयित निर्णयांमागे ‘अदृश्य हात’ चर्चेत रोखठोक न्यूजचा इशारा — सत्य बाहेर येईपर्यंत हा पाठपुरावा थांबणार नाही!

Bybaba maske

Feb 28, 2026

भाग-२ | नियुक्तीच्या आड कोणाचा आशीर्वाद?

केज नगरपंचायतीतील संशयित निर्णयांमागे ‘अदृश्य हात’ चर्चेत

रोखठोक न्यूजचा इशारा —

सत्य बाहेर येईपर्यंत हा पाठपुरावा थांबणार नाही!

रोखठोक न्यूज | केज

केज नगरपंचायतीत निवृत्त कर्मचारी लक्ष्मण जगताप यांची नियमबाह्य पद्धतीने झालेली नियुक्ती आता अधिकच वादाच्या केंद्रस्थानी आली असून, या संपूर्ण प्रकरणामागे नेमका कोणाचा आशीर्वाद होता? असा थेट सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. पहिल्या भागात उघड झालेल्या आदेशातील तारखा, दोन वर्षांचा थेट करार आणि नियुक्ती प्रक्रियेतील विसंगतीनंतर आता प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर संशय व्यक्त होत आहे.

नगरपंचायतीत कंत्राटी नियुक्तीसाठी ठराव, मंजुरी, जाहिरात व निवड प्रक्रिया आवश्यक असताना या प्रकरणात अशी कोणतीही पारदर्शक प्रक्रिया राबवण्यात आली का? याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. निवृत्तीनंतर तात्काळ महत्त्वाच्या लेखा विभागात प्रवेश देणे आणि त्यांच्याकडे प्रधानमंत्री आवास योजना व रमाई आवास योजनेसारखी आर्थिकदृष्ट्या संवेदनशील कामे सोपवणे हे योगायोग मानायचे की नियोजनबद्ध निर्णय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे, आदेश १४ फेब्रुवारी २०२२ रोजी काढण्यात आला असताना नियुक्ती १ जुलै २०२१ पासून लागू दाखवण्यात आली आहे. म्हणजेच मागील तारखेपासून नियुक्ती वैध ठरवण्याचा प्रयत्न झाला का? असा संशय व्यक्त केला जात आहे. प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीशिवाय असा आदेश निघूच शकत नाही, अशीही चर्चा नगरपंचायत वर्तुळात सुरू आहे.

दरम्यान, प्रधानमंत्री आवास योजनेतील कथित गैरव्यवहार आधीच चर्चेत असताना त्याच कालावधीत लेखा विभागात अशा प्रकारची नियुक्ती झाल्याने संशयाची साखळी अधिक मजबूत झाली आहे. निधी वितरण, बिल मंजुरी आणि खात्यांची पडताळणी या प्रक्रियांमध्ये नेमकी कोणाची भूमिका होती, याची चौकशी झाल्यास अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

नागरिकांचा स्पष्ट सवाल आहे —

 नियम मोडून नियुक्ती कोणी केली?

 आदेशातील तारखा का बदलल्या?

 आवास योजनांच्या व्यवहारांशी याचा काही संबंध आहे का?

आता या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही, तर केज नगरपंचायतीवरील जनतेचा विश्वास पूर्णपणे डळमळीत होईल, अशी तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे.

रोखठोक न्यूजचा इशारा —

सत्य बाहेर येईपर्यंत हा पाठपुरावा थांबणार नाही!

baba maske

Related Post

केज तहसील कार्यालयात भिमराव मस्के यांचामृतदेह आणून आंदोलन; ‘खरे आरोपींवर गुन्हे दाखल करा’ची मागणी घरकुल घोटाळ्याच्या मानसिक तणावातून कर्मचाऱ्याचा मृत्यू? संतप्त नातेवाईकांचा तहसील कार्यालयात आक्रोश
केज घरकुल घोटाळ्याच्या छायेत आणखी एक बळी? मानसिक तणावात असलेल्या नगरपंचायत कर्मचारी भिमराव मस्के यांचे हृदयविकाराने मृत्यू; जबाबदार कोण?
भांडण सोडवायला गेला, पण मृत्यूच्या दाढेत ढकलला गेला!टाकळीतील तरुणावर चाकू हल्ला; उपचारादरम्यान मृत्यू, आरोपींच्या अटकेसाठी ग्रामस्थांचा रस्ता रोको

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!