• Sun. Jun 28th, 2026

केज नगरपंचायत ३ कोटी ६२ लाखांचा घरकुल घोटाळा विधिमंडळात; आमदार नमिताताई मुंदडा यांची लक्षवेधी ३७४ लाभार्थ्यांचे घराचे स्वप्न उद्ध्वस्त; आठ दिवसांत चौकशीचा आदेश

Bybaba maske

Mar 5, 2026

केज नगरपंचायत ३ कोटी ६२ लाखांचा घरकुल घोटाळा विधिमंडळात; आमदार नमिताताई मुंदडा यांची लक्षवेधी

३७४ लाभार्थ्यांचे घराचे स्वप्न उद्ध्वस्त; आठ दिवसांत चौकशीचा आदेश

रोखठोक न्यूज वार्ताहर

केज नगरपंचायत अंतर्गत उघडकीस आलेल्या ३ कोटी ६२ लाख रुपयांच्या घरकुल घोटाळ्याचे पडसाद थेट विधिमंडळात उमटले असून, या प्रकरणी आमदार नमिताताई मुंदडा यांनी लक्षवेधीद्वारे प्रश्न उपस्थित केला.

२०१९ ते २०२२ या कालावधीत झालेला हा घोटाळा नगरपंचायत क्षेत्रातील आतापर्यंतचा सर्वात मोठा घरकुल घोटाळा मानला जात असून, या प्रकरणामुळे ३७४ गरजू कुटुंबांचे घराचे स्वप्न उद्ध्वस्त झाल्याची बाब विधिमंडळाच्या निदर्शनास आणून देण्यात आली.

आमदार नमिताताई मुंदडा यांनी हा जिव्हाळ्याचा आणि गंभीर विषय लक्षवेधीद्वारे मांडत प्रशासनाकडून सखोल चौकशीची मागणी केली. यावर उत्तर देताना राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांनी आठ दिवसांत या प्रकरणाची चौकशी करून अहवाल विधिमंडळाच्या पटलावर ठेवण्याचे निर्देश दिले.

दरम्यान, या चर्चेत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनीही सहभाग घेत, केवळ चौकशी करून काही निष्पन्न होत नाही, महाराष्ट्रात अशा हजारो चौकश्या झाल्या मात्र परिणाम दिसत नाही, असे मत व्यक्त करत त्या काळातील संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली.

यावर उत्तर देताना राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांनी लवकरच चौकशी पूर्ण करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असे स्पष्ट केले.

या घडामोडीमुळे केज नगरपंचायत घरकुल घोटाळ्याची गंभीरता राज्याच्या विधिमंडळात पोहोचली असून, आता प्रशासन कोणती कारवाई करते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

baba maske

Related Post

केज तहसील कार्यालयात भिमराव मस्के यांचामृतदेह आणून आंदोलन; ‘खरे आरोपींवर गुन्हे दाखल करा’ची मागणी घरकुल घोटाळ्याच्या मानसिक तणावातून कर्मचाऱ्याचा मृत्यू? संतप्त नातेवाईकांचा तहसील कार्यालयात आक्रोश
केज घरकुल घोटाळ्याच्या छायेत आणखी एक बळी? मानसिक तणावात असलेल्या नगरपंचायत कर्मचारी भिमराव मस्के यांचे हृदयविकाराने मृत्यू; जबाबदार कोण?
भांडण सोडवायला गेला, पण मृत्यूच्या दाढेत ढकलला गेला!टाकळीतील तरुणावर चाकू हल्ला; उपचारादरम्यान मृत्यू, आरोपींच्या अटकेसाठी ग्रामस्थांचा रस्ता रोको

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!