• Wed. Jun 3rd, 2026

केज नगरपंचायतचे भीमनगर वॉर्ड १६ मधील पाणी व नाली प्रश्नाकडे दुर्लक्ष बोरवेल बंद, नाली अर्धवट – नागरिक त्रस्त; प्रशासन मात्र गप्प निवेदनाला महिना उलटला तरी दखल नाही;

Bybaba maske

Mar 8, 2026

केज नगरपंचायतचे भीमनगर वॉर्ड १६ मधील पाणी व नाली प्रश्नाकडे दुर्लक्ष

बोरवेल बंद, नाली अर्धवट – नागरिक त्रस्त; प्रशासन मात्र गप्प

निवेदनाला महिना उलटला तरी दखल नाही;

रोखठोक न्यूज वार्ताहर

केज शहरातील नगरपंचायत अंतर्गत वॉर्ड क्रमांक १६ भीमनगर येथे मूलभूत सुविधांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून नागरिकांना पाणीटंचाई आणि अपूर्ण कामांमुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या संदर्भात भ्रष्टाचार निर्मूलन समिती मार्फत नगरपंचायत प्रशासनाला निवेदन देऊनही महिनाभर उलटून गेला तरी कोणतीही दखल घेतली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

निवेदनानुसार भीमनगर परिसरातील रस्त्याचे काम अर्धवट ठेवून नाली खोदून तशीच ठेवण्यात आली आहे. त्यामुळे नालीतील साचलेल्या घाणीमुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

तसेच परिसरातील सार्वजनिक पाण्याची बोरवेल अनेक दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. काही कुटुंबांना पाणी विकत घेऊन गुजराण करावी लागत असल्याचीही खंत स्थानिकांनी व्यक्त केली.

या सर्व समस्यांबाबत इंजि. अक्षय रवींद्र हजारे, शहर अध्यक्ष – भ्रष्टाचार निर्मूलन समिती यांनी २० जानेवारी २०२६ रोजी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांना लेखी निवेदन दिले होते. मात्र एक महिना उलटूनही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

आता तरी प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन बंद बोरवेल सुरू करावी व अपूर्ण नाली व रस्त्याचे काम पूर्ण करावे, अशी मागणी भीमनगरमधील नागरिकांकडून होत आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!