राज्य महिला अध्यक्षपदी आमदार नमिताताई मुंदडा यांची नियुक्ती करावी; जनतेतून जोरदार मागणी
महिला प्रश्नांवर अभ्यासू व कार्यक्षम नेतृत्वाला संधी देण्याची सर्व स्तरातून अपेक्षा
रोखठोक न्यूज वार्ताहर
मतदारसंघातील विविध प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणाऱ्या आणि दोन टर्मच्या आमदार म्हणून ठसा उमटवलेल्या आमदार नमिताताई अक्षय मुंदडा यांच्या नावाची राज्य महिला अध्यक्षपदासाठी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या कार्यशैलीमुळे आणि जनतेशी असलेल्या नात्यामुळे सर्वसामान्य नागरिकांतून त्यांची या पदासाठी नियुक्ती करावी, अशी मागणी वेग घेत आहे.
आमदार म्हणून काम करताना त्यांनी पाणीपुरवठा, रस्ते, घरकुल, महिला सक्षमीकरण यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर पोटतिडकीने पाठपुरावा केला आहे. मतदारसंघातील अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावताना त्यांनी शासनाकडून मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर करून आणला आहे. त्यामुळे त्या एक अभ्यासू व परिणामकारक नेतृत्व म्हणून ओळखल्या जातात.
महिलांशी संबंधित प्रश्नांवर त्यांचा सखोल अभ्यास आणि संवेदनशील दृष्टिकोन लक्षात घेता, राज्य महिला अध्यक्षपदासाठी त्या योग्य उमेदवार ठरू शकतात, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे महिला प्रश्नांना न्याय मिळेल आणि राज्यभरातील महिलांच्या अडचणी अधिक प्रभावीपणे मांडल्या जातील, असे मत विविध स्तरातून व्यक्त होत आहे.
यामुळेच आता राज्य सरकारने या मागणीची दखल घेऊन आमदार नमिताताई मुंदडा यांची राज्य महिला अध्यक्षपदी नियुक्ती करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
