• Mon. May 25th, 2026

केज नगरपंचायत घोटाळ्यांचा भांडाफोड! २०१५ ते २०२६ मधील कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशीची मागणी;भाई मोहन गुंड “रोखठोक न्यूज”च्या मालिकेचा परिणाम; भाई मोहन गुंड यांचे मुख्य सचिव व नगरविकास प्रधान सचिवांना निवेदन — घरकुल, रस्ते, स्वच्छता, घनकचरा योजनेतील गैरव्यवहार उघड

Bybaba maske

Mar 20, 2026
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

केज नगरपंचायत घोटाळ्यांचा भांडाफोड! २०१५ ते २०२६ मधील कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशीची मागणी;भाई मोहन गुंड

“रोखठोक न्यूज”च्या मालिकेचा परिणाम; भाई मोहन गुंड यांचे मुख्य सचिव व नगरविकास प्रधान सचिवांना निवेदन — घरकुल, रस्ते, स्वच्छता, घनकचरा योजनेतील गैरव्यवहार उघड

रोखठोक न्यूज Impact | केज (जि. बीड)

केज नगरपंचायतीतील २०१५ ते २०२६ या कालावधीत विविध विकास कामांमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करत भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे राज्य चिटणीस मंडळ सदस्य भाई मोहन गुंड यांनी थेट राज्याच्या मुख्य सचिव व नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे चौकशीची मागणी केली आहे.

“रोखठोक न्यूज”ने सातत्याने उघड केलेल्या अनियमिततेच्या बातम्यांची दखल घेत अखेर हे प्रकरण मंत्रालयापर्यंत पोहोचले असून, केज नगरपंचायतीच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

🔴 एकाच कामासाठी अनेक वेळा निधी?

नगरपंचायतीमध्ये रस्ते, नाल्या, सभागृह यांसारखीच कामे वेगवेगळ्या योजनेच्या नावाखाली पुन्हा पुन्हा दाखवून निधी उचलल्याचे आरोप करण्यात आले आहेत. जनरल निधी आणि विकास कामांवरील खर्च यामध्ये ताळमेळ नसल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

🔴 घरकुल योजनेत ३.६२ कोटींचा अपहार?

सन २०१८-१९ मधील पंतप्रधान आवास योजनेत पात्र लाभार्थ्यांच्या हक्काचे सुमारे ३ कोटी ६२ लाख रुपये अपहार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

यासंदर्भात सध्या चौकशी सुरू असली तरी संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून:अपहाराची रक्कम परत मिळवावी लाभार्थ्यांना हक्काची घरे द्यावी अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.

🔴 दोषींवर कारवाईची मागणी

घरकुल घोटाळ्यात सहभागी असलेले अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदार यांच्यावर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

🔴 दलित वस्ती सुधार योजनेतील निधी गायब?

दि. ५ ऑगस्ट २०१९ रोजी प्रशासकीय मान्यता मिळालेल्या ३२.९५ लाखांच्या फुले आंबेडकर नगर मधील  सभागृह कामाच्या निधीचा विनियोग कसा झाला, याबाबतही संशय व्यक्त करण्यात आला आहे.

🔴 रस्ता व घनकचरा घोटाळा 

रस्त्यांच्या कामात एकाच कामासाठी दोन वेळा निधी खर्चnस्वच्छता अभियानात दुहेरी बिलिंग घंटागाड्या व वाहन खरेदीत अनियमितता घनकचरा व्यवस्थापनात मोठी अफरातफर अशा अनेक गंभीर बाबींचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे.

 मंगळवार पेठ कॉर्नर ( विजय प्रकाश ठोंबरे ) ते आंबेडकर चौक रस्ता – कामासाठी ८० लाख ६० हजार रुपये मंजूर होते. सदर काम प्रत्यक्ष न करताच बिल उचलल्याची दाट शक्यता असल्याने याची तांत्रिक तपासणी करण्यात यावी. ५) फुलेनगस् रस्ता काम चौकशीः दि.३१/१२/२०२१ रोजी दलित वस्ती सुधार योजनेतून फुलेनगर रस्त्यासाठी मंजूर १ कोटी ६३ लाख ६३ हजार रुपयांच्या कामाची गुणवत्ता आणि कागदपत्रांची चौकशी व्हावी. घोटाळ्याची सखोल चौकशीसाठी समिती गठीत न झाल्यास केज नगरपंचायत समोर 15 मार्च पासुन आन्नत्या आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी विनंती..

🔴 जमीन नोंदणी फेरफार प्रकरणही संशयात

जागा नोंदणी व फेरफार प्रक्रियेतही मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला असून, या प्रकरणाचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

🔴 चौकशी समितीत नागरिकांचा समावेश करा

२०१५ ते २०२६ या कालावधीतील सर्व विकास कामांची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र समिती गठित करून त्यामध्ये स्थानिक नागरिकांचाही समावेश करावा, अशी महत्त्वाची मागणी करण्यात आली आहे.

🟡 “रोखठोक न्यूज”चा प्रभाव

केज नगरपंचायतीतील अनियमिततेवर “रोखठोक न्यूज”ने सातत्याने प्रकाश टाकला. या बातम्यांमुळेच अखेर शासन स्तरावर हालचाल सुरू झाली असून, आता चौकशीची मागणी अधिक तीव्र झाली आहे.

निष्कर्ष :

केज नगरपंचायतीतील कथित घोटाळ्यांची व्याप्ती पाहता, हा केवळ स्थानिक पातळीवरील मुद्दा नसून राज्यस्तरीय चौकशीचा विषय बनला आहे. आता शासन काय भूमिका घेते आणि दोषींवर कारवाई होते का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!