• Sun. Sep 13th, 2026

वीजचोरांवर ‘करंट’ कारवाई! शाखा अभियंता शितल सय्यद यांचा धडाका; २० लाखांचा महसूल वसूल कारवाईने घाबरले वीजचोर आंदोलनाच्या मार्गावर; धमक्यांनाही न जुमानता महावितरणची कडक भूमिका

Bybaba maske

Mar 22, 2026

वीजचोरांवर ‘करंट’ कारवाई! शाखा अभियंता शितल सय्यद यांचा धडाका; २० लाखांचा महसूल वसूल

कारवाईने घाबरले वीजचोर आंदोलनाच्या मार्गावर; धमक्यांनाही न जुमानता महावितरणची कडक भूमिका

रोखठोक न्यूज केज | प्रतिनिधी

केज शहर व तालुक्यात वीजचोरीविरोधात महावितरणने धडक मोहीम राबवत मोठी कारवाई केली असून, शाखा अभियंता शितल सय्यद  यांच्या नेतृत्वाखाली २० लाख रुपयांहून अधिक महसूल वसूल करण्यात आला आहे. या कठोर कारवाईमुळे वीजचोरी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, आता काही वीजचोरांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारल्याचे चित्र आहे.

मागील महिन्यात ११ फेब्रुवारीपासून वसुलीची जबाबदारी पुन्हा सय्यद मॅडम व त्यांच्या टीमकडे आल्यानंतर केवळ एका महिन्यात १६८ टक्के विक्रमी वसुली करण्यात आली. ही कामगिरी केज विभागातील आतापर्यंतची सर्वाधिक मानली जात आहे.

या काळात ७० हून अधिक वीजचोरीच्या घटना उघडकीस आणून संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यामुळे महावितरणला मोठा आर्थिक फायदा झाला असून, शासकीय महसुलात भर पडली आहे.

शितल सय्यद  यांच्या कठोर व पारदर्शक कार्यपद्धतीमुळे अनेक वर्षे सुरू असलेल्या वीजचोरीवर लगाम बसू लागला आहे. मात्र याच कारवाईमुळे अडचणीत आलेले काही वीजचोर आता आंदोलन करून दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे.

शितल सय्यद यांनी कर्मचाऱ्यांना निर्भयपणे काम करण्याचे मार्गदर्शन करत संपूर्ण टीममध्ये नवचैतन्य निर्माण केले आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे केज महावितरण विभागाची कामगिरी उंचावली असून, सर्व स्तरातून त्यांच्या कामाचे कौतुक होत आहे.

चौकट :

“वीजचोरी करणाऱ्यांवर कारवाई सुरूच राहणार आहे. काही जण धमक्या देत बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र अशा प्रकारांना न घाबरता महावितरण व पोलिसांच्या मदतीने कठोर कारवाई केली जाईल.”

— शितल सय्यद, शाखा अभियंता

विशेष म्हणजे, यापूर्वीही कठोर कारवाईमुळे चर्चेत आलेल्या सय्यद मॅडम यांनी कोणत्याही दबावाला न झुकता आपले कर्तव्य बजावत वीजचोरी रोखण्यावर भर दिला आहे. त्यामुळेच सध्या केजमध्ये “कारवाई की आंदोलन?” असा प्रश्न निर्माण झाला असून, प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या पाठीशी प्रशासन ठाम उभे राहणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!