• Wed. Jun 3rd, 2026

अंबाजोगाईत राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष अॅड. ईस्माइल गवळी यांच्यावर रुग्णालयात अमानुष मारहाण; परिसरात तणाव सुरक्षा रक्षकांकडून मारहाण – निष्पक्ष चौकशी व कठोर कारवाईची नागरिकांची मागणी

Bybaba maske

Mar 25, 2026
Screenshot

अंबाजोगाईत राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष अॅड. ईस्माइल गवळी यांच्यावर रुग्णालयात अमानुष मारहाण; परिसरात तणाव

सुरक्षा रक्षकांकडून मारहाण – निष्पक्ष चौकशी व कठोर कारवाईची नागरिकांची मागणी

रोखठोक न्यूज अंबाजोगाई | प्रतिनिधी :

अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाचे शहराध्यक्ष अॅड. ईस्माइल गवळी यांच्यावर रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांकडून अमानुष मारहाण झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या घटनेत त्यांच्या सोबत असलेल्या आणखी दोन ते तीन जणांनाही मारहाण झाल्याची माहिती मिळत आहे.

ही घटना अत्यंत गंभीर स्वरूपाची असून लोकशाही मूल्यांना धक्का देणारी असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. कायद्याचे व सुरक्षिततेचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणेकडूनच अशा प्रकारचे वर्तन झाल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनेनंतर मोठ्या संख्येने नागरिक रुग्णालय परिसरात जमा झाले असून परिसरात तणावपूर्ण शांतता निर्माण झाली आहे. संबंधित प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच अॅड. गवळी यांना न्याय मिळवून द्यावा, अशी ठाम मागणी नागरिकांकडून होत आहे.

दरम्यान, अशा घटनांना आळा बसावा आणि नागरिकांचा कायद्यावरील विश्वास अबाधित राहावा यासाठी शासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अन्यथा नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात येत आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!