केज नगरपंचायतविरोधात रणशिंग! २७ पासून मोहन गुंड यांचे अन्नत्याग आंदोलन
घरकुल घोटाळा, अपूर्ण विकासकामे, निधी अपहारासह १० गंभीर मुद्द्यांवर उपोषण
रोखठोक न्यूज| प्रतिनिधी
केज नगरपंचायतच्या कारभाराविरोधात आता थेट लढ्याची हाक देण्यात आली असून,भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे नेते व सामाजिक कार्यकर्ते मोहन गुंड हे दिनांक २७ पासून अन्नत्याग आंदोलन सुरू करणार असल्याची माहिती निवेदनातून समोर आली आहे. नगरपंचायतीतील विविध गैरप्रकार, अपूर्ण कामे आणि घरकुल योजनेतील अन्याय या पार्श्वभूमीवर हे आंदोलन उभारण्यात येत आहे.
निवेदनात एकूण १० गंभीर मुद्दे अधोरेखित करण्यात आले असून, नागरिकांवर अन्याय होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
उपोषणाचे प्रमुख मुद्दे :
१.) पंतप्रधान आवास योजना (२०१८-१९) मधील पात्र लाभार्थ्यांच्या हक्काचे ३ कोटी ६२ लाख रुपये अपहार झाले असून, सदर रक्कम मूळ लाभार्थ्यांना परत मिळवून द्यावी. किंवा त्यांना प्रशासनाने घरकुल उपलब्ध करून देण्यात यावे
२.) घरकुल घोटाळ्याची रक्कम इतर ठिकाणी वर्ग करून चुकीच्या पद्धतीने हाडप करणारे संबंधित दोषी यांच्या कडून मुळ रक्कम जामा करून घेऊन संबंधितांवर कारवाई करा..
3.) दलित वस्ती सुधार योजना दि. ५/८/२०१९ रोजीच्या प्रशासकीय मान्यतेनुसार, सभागृहाच्या कामासाठी पाप्त ३२ लाख ९५ हजार रुपयांच्या निधीचा विनियोग कसा झाला त्याची चौकशी करा.
४.) ३१/१२/२०२० रोजीच्या ‘दलितेत्तर’ योजनेतील प्रशासकीय मान्यते नुसार, मंगळवार पेठ कॉर्नर ( विजय प्रकाश ठोंबरे ते आंबेडकर चौक रस्ता कामासाठी लाख ६० हजार रुपये मंजूर होते. सदर काम प्रत्यक्ष न करताच बिल उचलले ती रक्कम कुठं गेली याची चौकशी करण्यात यावी
५.) दि. ३१/१२/२०२१ रोजी दलित वस्ती सुधार योजनेतून फुलेनगर रस्त्यासाठी मंजूर कोटी ६३ लाख ६३ हजार रुपयांच्या कामाची गुणवत्ता तपासणी करून चौकशी करा,
६) केज नगरपंचायतीच्या जनरल खात्यातुन 2019 ते मार्च 2026 या कालावधी मध्ये कशावर खर्च झाला तपशीलवार या महिती द्या.
७) वाईन शॉपसाठी वाल्मीक कराड यांना नेमा बाह्य ना हारकत प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, त्यांची संचीका उपलब्ध करून द्यावी.
८) केज नगरपंचापंयत ने जिल्हा परिषद माध्यमिक शाळेची जागा हस्तांतराचा घेतलेला ठराव रद्द करावा.
९) घरकुल पंतप्रधान आवास योजने अंतर्गत मुंजर झालेल्या १२१५ घरकुल धारकामधील घर बाधलेल्या घरकुल धारकाला त्वरीत रक्कम वर्ग करा..
१०) केज शहरात विकास कामांसाठी विविध विभागाला देण्यात आलेल्या नाहरकत प्रमाणपत्र कशासाठी दिले यादी. व केज शहारात एकुण विद्यन विहिर (बोरवेल) किती व कुठे आहेत याची यादी.
निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, या सर्व मुद्द्यांवर तात्काळ निर्णय घेऊन दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल.
दरम्यान, २७ तारखेपासून सुरू होणाऱ्या या अन्नत्याग आंदोलनामुळे केज शहरात प्रशासनाविरोधात तीव्र वातावरण निर्माण होण्याची शक्यता असून, नागरिकांचे लक्ष आता या आंदोलनाकडे लागले आहे
