• Sat. Apr 18th, 2026

केज नगरपंचायतची मासिक बैठक लाईव्ह करा; पारदर्शकतेसाठी नागरिकांची ठाम मागणी खमके नेतृत्व नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा अंबाजोगाई नगरपरिषदेत निर्णय घेऊ शकतात तर केजचे सर्वेसर्वा उपाधी लावणारे का नाही? अंबाजोगाईत शक्य तर केजमध्ये का नाही? एकतर्फी निर्णयांवर आळा घालण्यासाठी जनतेचा सवाल

Bybaba maske

Mar 27, 2026

केज नगरपंचायतची मासिक बैठक लाईव्ह करा; पारदर्शकतेसाठी नागरिकांची ठाम मागणी

खमके नेतृत्व नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा अंबाजोगाई नगरपरिषदेत निर्णय घेऊ शकतात तर केजचे सर्वेसर्वा उपाधी लावणारे का नाही?

अंबाजोगाईत शक्य तर केजमध्ये का नाही? एकतर्फी निर्णयांवर आळा घालण्यासाठी जनतेचा सवाल

रोखठोक न्यूज वार्ताहर | केज

केज नगरपंचायतच्या सर्वसाधारण मासिक बैठकीचे  थेट (लाईव्ह) प्रक्षेपण सुरू करावे, अशी जोरदार मागणी आता शहरातील नागरिकांकडून होत आहे. नगरपंचायतच्या बैठकीत घेतले जाणारे महत्त्वाचे निर्णय, नगरसेवकांनी मांडलेले प्रश्न आणि विकासकामांबाबतची चर्चा ही सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावी, यासाठी ही मागणी पुढे येत आहे.दरम्यान, अंबाजोगाई येथील नगरपरिषदेत पारदर्शक कारभाराच्या दृष्टीने सर्वसाधारण सभांचे लाईव्ह प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांच्या पुढाकारामुळे हा निर्णय अमलात आला असून, त्यामुळे तेथील नागरिकांना आपल्या प्रतिनिधींचे कामकाज थेट पाहता येत आहे.

याच धर्तीवर केज नगरपंचायतनेही पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. “आमच्या वार्डातील नगरसेवक आमचे प्रश्न मांडतात का? कोणते निर्णय घेतले जातात? हे आम्हाला थेट पाहायला मिळाले पाहिजे,” अशी भूमिका नागरिक मांडत आहेत.

सध्या काही निर्णय एकतर्फी होत असल्याची चर्चा असून, लाईव्ह प्रक्षेपण सुरू झाल्यास पारदर्शकता वाढेल आणि प्रशासनावर जनतेचा विश्वास अधिक दृढ होईल, असे मत व्यक्त केले जात आहे.

“अंबाजोगाईत हे शक्य आहे, तर केजमध्ये का नाही?” असा थेट सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे केज नगरपंचायतीने तातडीने हा निर्णय घेऊन सर्वसाधारण सभांचे लाईव्ह प्रक्षेपण सुरू करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

या मागणीमुळे येत्या काळात केजमधील राजकीय आणि प्रशासकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!