• Sat. Sep 12th, 2026

अंबाजोगाईत धक्कादायक घटना! तिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन विवाहितेची आत्महत्या मांडवा रोड परिसरात सकाळी घडली घटना; मानसिक त्रासामुळे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती

Bybaba maske

Mar 28, 2026

अंबाजोगाईत धक्कादायक घटना! तिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन विवाहितेची आत्महत्या

मांडवा रोड परिसरात सकाळी घडली घटना; मानसिक त्रासामुळे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती

रोखठोक न्यूज अंबाजोगाई (प्रतिनिधी) —

शहरातील मांडवा रोड परिसरात आज (दि. २८) सकाळी एक धक्कादायक घटना उघडकीस आली. एका विवाहित महिलेने राहत्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जवळगाव येथील रहिवासी सुनील चिकटकर हे आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी अंबाजोगाई येथे मांडवा रोडवरील शितोळे यांच्या तीन मजली इमारतीत भाड्याने राहत होते. आज सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास घरात कोणीही नसल्याची संधी साधून त्यांच्या पत्नी सौ. वैशाली सुनील चिकटकर यांनी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेतली.

या घटनेत त्या रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडल्या असून त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

दरम्यान, संबंधित महिला काही काळापासून मानसिक त्रासाने ग्रस्त असल्याची माहिती समोर येत असून त्यांच्यावर उपचार सुरू होते, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!