• Sat. Apr 18th, 2026

केज येथे दोन कार आणि एसटी बसचा तिहेरी अपघात!  दोन कारला एसटीची मागून जोरदार धडक.  जखमी दत्ता लांडगे हे लहुजी सेनेच्या तालुकाध्यक्ष प्रियंका लांडगे यांचे पती असल्याची माहिती आहे.

Bybaba maske

Apr 5, 2026

केज येथे दोन कार आणि एसटी बसचा तिहेरी अपघात!
 दोन कारला एसटीची मागून जोरदार धडक.

 जखमी दत्ता लांडगे हे लहुजी सेनेच्या तालुकाध्यक्ष प्रियंका लांडगे यांचे पती असल्याची माहिती आहे.

गौतम बचुटे | केज :
केज-अंबाजोगाई मार्गावर पिसेगाव फाटा परिसरातील पेट्रोल पंपाजवळ रविवारी (दि. ५ मार्च) दुपारी सुमारे १:४५ वाजण्याच्या सुमारास दोन कार आणि एसटी बसचा भीषण तिहेरी अपघात झाला. या अपघातात तिन्ही वाहनांचे चालक जखमी झाले असून सुदैवाने मोठी जीवितहानी टळली.

प्राप्त माहितीनुसार, अंबाजोगाईकडून येणारी एक कार पेट्रोल पंपाकडे वळत असल्याने तिच्या मागून येणाऱ्या मारुती सुझुकी स्विफ्ट (क्र. MH12/GR 9022) आणि मारुती सुझुकी रिट्झ (क्र. MH06/BM 1682) या दोन कार चालकांनी वेग कमी केला. याच वेळी पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या अंबाजोगाई आगाराच्या अंबाजोगाई–संभाजीनगर एसटी बसने (क्र. MH09/FL 1021) या दोन्ही कारना मागून जोराची धडक दिली.

या धडकेत स्विफ्ट कार रस्त्याच्या कडेला जाऊन खड्ड्यात पलटीसारखी जाऊन मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाली. तरीही चालक दत्ता लांडगे (रा. केज, जि. बीड) हे केवळ मुका मार लागून जखमी झाले. तसेच रिट्झ कारचे चालक विनोद जगताप (रा. कळंब, जि. धाराशिव) आणि एसटी चालक मारुती फड (रा. पट्टीवडगाव, ता. परळी) हेही जखमी झाले आहेत.

दरम्यान, एसटी बसमध्ये सुमारे १७ प्रवासी प्रवास करत होते, अशी माहिती वाहक बालासाहेब नागिशे यांनी दिली. सुदैवाने कोणत्याही प्रवाशाला गंभीर दुखापत झाली नाही. रिट्झ कारमधून एका महिलेला प्रसूतीसाठी सोडून परत येत असताना हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे.

विशेष म्हणजे, अपघातास कारणीभूत ठरलेला पेट्रोल पंपाकडे वळणारा कार चालक अपघातानंतर घटनास्थळावरून फरार झाला. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

या अपघातात जखमी झालेल्या दत्ता लांडगे हे लहुजी सेनेच्या तालुकाध्यक्ष प्रियंका लांडगे यांचे पती असल्याची माहिती आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!