खमके नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांनी ४ कोटी ७८ लाखांचा निधी खेचून आणला
दलितेत्तर वस्ती सुधार योजनेअंतर्गत विकासकामांना प्रशासकीय मान्यता; पहिल्या टप्प्यात ७५ लाखांची कामे मंजूर
रोखठोक न्यूज | अंबाजोगाई प्रतिनिधी
अंबाजोगाई शहराच्या नागरी विकासाला गती देणारा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला असून, जिल्हा वार्षिक योजना २०२५-२६ अंतर्गत नागरी दलितेत्तर वस्ती सुधार योजनेमधून अंबाजोगाई नगरपरिषदेच्या विविध विकासकामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत नगरपरिषदेने प्रस्तावित केलेल्या ७५ लाख १ हजार २७६ रुपयांच्या कामांना बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी अधिकृत मंजुरी प्रदान केली आहे.
या मंजुरीमुळे शहरातील अनेक प्रलंबित विकासकामांचा मार्ग मोकळा झाला असून, विशेषतः प्रभाग क्रमांक ४, ६ आणि ८ मधील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या निधीसाठी आमदार नमिता मुंदडा व खमके नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांनी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला होता. नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांच्या पुढाकारातून नगरपरिषदेने सादर केलेल्या प्रस्तावाला यश मिळाल्याने शहराच्या विकास आराखड्याला नवी गती मिळणार आहे.
बीड जिल्ह्यास ३५.५३ कोटी; अंबाजोगाईला ४.७८ कोटींचा वाटा
नागरी दलितेत्तर वस्ती सुधार योजनेअंतर्गत बीड जिल्ह्यासाठी एकूण ३५ कोटी ५३ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, लोकसंख्येच्या प्रमाणावर अंबाजोगाई नगरपरिषदेला तब्बल ४ कोटी ७८ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील ७५ लाख रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे.
या भागांत होणार विकासकामे
मंजूर निधीतून शहरातील विविध भागांमध्ये खालीलप्रमाणे कामे हाती घेतली जाणार आहेत—
प्रभाग क्र. ६, माळी नगर परिसरात
गणेश राऊत ते उंबरकर तसेच अर्जुन बाघमारे ते शिनगारे या मार्गांवर सीसी नाली व सीसी रस्त्यांचे बांधकाम
प्रभाग क्र. ४, प्रशांत नगर परिसरात
परशुराम मेहता ते बाळासाहेब इखे यांच्या घरापर्यंत सौसी रोड व नाली बांधकाम
नगरपरिषद कार्यालयात प्रशासकीय सुविधा वाढणार
अंबाजोगाई नगरपरिषद इमारतीवर दुसऱ्या मजल्यावर नवीन हॉलचे बांधकाम
मुख्याधिकाऱ्यांवर अंमलबजावणीची जबाबदारी
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मंजूर सर्व विकासकामांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मुख्याधिकारी, नगरपरिषद अंबाजोगाई यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
