• Sat. Apr 18th, 2026

वारसा हक्कासाठी तलाठ्याची पैशांची भूक! परमेश्वर जाधव ३५ हजारांची लाच मागताना एसीबीच्या जाळ्यात केज तालुक्यातील दहीफळ वडमाऊली येथील घटना 

Bybaba maske

Apr 8, 2026

वारसा हक्कासाठी तलाठ्याची पैशांची भूक!

परमेश्वर जाधव ३५ हजारांची लाच मागताना एसीबीच्या जाळ्यात

केज तालुक्यातील दहीफळ वडमाऊली येथील घटना 

रोखठोक न्यूज प्रतिनिधी | केज

सामान्य नागरिकांच्या वारसा हक्क प्रमाणपत्रासाठीही लाचेचा दर ठरवणाऱ्या महसूल यंत्रणेचा घाणेरडा चेहरा पुन्हा समोर आला असून, केज तालुक्यातील दहिफळ वडमाऊली येथील तलाठी परमेश्वर जाधव यांना ३५ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.

माहितीनुसार, वारसा हक्क प्रमाणपत्र मंजूर करून देण्यासाठी जाधव यांनी सुरुवातीला ३९ हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीनंतर ३५ हजारांवर व्यवहार ठरला. त्यातील पहिला हप्ता म्हणून ९ हजार रुपये स्वीकारताना एसीबीच्या पथकाने सापळा रचून त्यांना जेरबंद केले.

ही कारवाई डिवायएसपी सोपान चितमपल्लेसर्वसेरवसे, पुरी यांच्या पथकाने केली. या धडक कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली असून भ्रष्ट अधिकाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!