• Sun. Jul 26th, 2026

मागासवर्गीय होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप; आर.आर. पाटील एज्युकेशन ट्रस्टचा उपक्रम मांजर्डे येथे ४९ विद्यार्थ्यांना रोख धनादेश वितरण; आमदार रोहित पाटील यांची प्रमुख उपस्थिती

Bybaba maske

Apr 8, 2026

मागासवर्गीय होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप; आर.आर. पाटील एज्युकेशन ट्रस्टचा उपक्रम

मांजर्डे येथे ४९ विद्यार्थ्यांना रोख धनादेश वितरण; आमदार रोहित पाटील यांची प्रमुख उपस्थिती

रोखठोक न्यूज तासगाव प्रतिनिधी :

तासगाव–कवठेमहांकाळ मतदारसंघाचे आमदार रोहितदादा आर. आर. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आर. आर. पाटील एज्युकेशन ट्रस्ट, मुंबईच्या वतीने मांजर्डे येथील बौद्ध विहारात मागासवर्गीय हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले. पाचवी ते पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या एकूण ४९ विद्यार्थ्यांना रोख रकमेचे धनादेश प्रदान करण्यात आले.

या कार्यक्रमास ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत सीताराम रणखांबे, जि.प. सदस्य मोहन नाना पाटील, माजी सभापती कमलताई दिनकरदादा पाटील, सरपंच संध्याराणी मंडले आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार रोहित पाटील म्हणाले की, “बौद्ध तसेच वंचित समाजातील प्रत्येक घटकाने पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहावे, हा ट्रस्टचा उदात्त हेतू आहे.” त्यांनी ट्रस्टच्या कार्याचे कौतुक करत उपक्रमांची व्याप्ती प्रत्येक गावात वाढविण्याचा मानस व्यक्त केला.

कार्यक्रमात सांगली जिल्ह्यातील प्रथम महिला आय.आर.एस. अधिकारी सुधा श्रीकांत रणखांबे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच ‘बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मानकरी साहित्यिक नवनाथ रणखांबे आणि राष्ट्रपती पदक विजेते ‘रुबाब’ चित्रपटाचे दिग्दर्शक शेखर रणखांबे यांचाही गौरव करण्यात आला.

यावेळी विविध मान्यवर, ट्रस्टचे पदाधिकारी, शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी, ग्रामपंचायत सदस्य, बौद्ध समाज व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सुभाष बबन रणखांबे यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन विक्रांत पाटील यांनी तर आभार नवनाथ आनंदा रणखांबे यांनी मानले.

baba maske

Related Post

शिक्षकाचा संशयास्पद मृत्यू; तथागत चौकात मृतदेह आढळल्याने खळबळदोन दिवसांत दुसरी गंभीर घटना; शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह
केज तहसील कार्यालयात भिमराव मस्के यांचामृतदेह आणून आंदोलन; ‘खरे आरोपींवर गुन्हे दाखल करा’ची मागणी घरकुल घोटाळ्याच्या मानसिक तणावातून कर्मचाऱ्याचा मृत्यू? संतप्त नातेवाईकांचा तहसील कार्यालयात आक्रोश
केज घरकुल घोटाळ्याच्या छायेत आणखी एक बळी? मानसिक तणावात असलेल्या नगरपंचायत कर्मचारी भिमराव मस्के यांचे हृदयविकाराने मृत्यू; जबाबदार कोण?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!