• Sat. Apr 18th, 2026

केजमध्ये मा. प्रा. विठ्ठल कोगणे सर यांचे प्रबोधनपर व्याख्यान १० एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर युवकांना मार्गदर्शन कार्यक्रमाचे उद्घाटन मा. हारुणभाई इनामदार यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. राकेश गिडे (तहसीलदार, केज) 

Bybaba maske

Apr 8, 2026

केजमध्ये मा. प्रा. विठ्ठल कोगणे सर यांचे प्रबोधनपर व्याख्यान १० एप्रिल रोजी

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर युवकांना मार्गदर्शन

कार्यक्रमाचे उद्घाटन मा. हारुणभाई इनामदार यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. राकेश गिडे (तहसीलदार, केज) 

रोखठोक न्यूज वार्ताहर 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे अनुयायी, युवकांच्या गळ्यातील ताईत व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक म्हणून ओळख असलेले मा. प्रा. विठ्ठल कोगणे सर यांचे प्रबोधनपर व्याख्यान शुक्रवार दि. १० एप्रिल २०२६ रोजी रात्री ९.०० वाजता आयोजित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम एलएफसी चौक, महात्मा फुले नगर, केज येथे होणार आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटन मा. हारुणभाई इनामदार यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. राकेश गिडे (तहसीलदार, केज) हे राहणार आहेत.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. दत्तात्रय केंद्रे, मा. जलालभाई इनामदार, मा. हनुमंत सीदागर, मा. सुजाता रामटेके, मा. दीपक काळे, मा. विकास मिरगणे, मा. लक्ष्मण हजारे, मा. राजुभाई इनामदार (सभापती, न.प. केज), मा. हनुमंत भोसले, डॉ. व्यंकट चाटे, अॅड. भागवत ढाकणे, मा. मंदाकिनी घाडगे, मा. बाळासाहेब भांगे आणि मा. शाहरुख पटेल यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या प्रबोधनपर व्याख्यानाचा लाभ युवक, विद्यार्थी व नागरिकांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन भिम जयंती उत्सव कमिटीच्या अध्यक्ष नगरसेवक पद्मिन शिंदे यांनी  केले आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!