• Wed. Jun 3rd, 2026

*आरोग्य उपसंचालकांच्या आदेशाला जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याकडून केराची टोपली*

Bybaba maske

Oct 27, 2022

आरोग्य उपसंचालकांच्या आदेशाला जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याकडून केराची टोपली

उस्मानाबाद प्रतिनिधी – प्रतिनियुक्ती / सेवा वर्ग केलेल्या वैद्यकीय अधिकारी/ कर्मचारी यांचे सेवा वर्ग / प्रतिनियुक्ती आदेश रद्द करून मूळ पदस्थापनेवर सेवा परत करण्याचा आदेश लातूरच्या आरोग्य उपसंचालक डॉक्टर कमल चामले यांनी देऊनही  जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी एकाही कर्मचाऱ्यांची  प्रतिनियुक्ती रद्द न केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

उस्मानाबादच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी लातूरच्या उपसंचालकांची पूर्व परवानगी न घेता परस्पर  प्राथमिक आरोग्य केंद्राचे काही वैद्यकीय अधिकारी तसेच 20 ते 25 कर्मचारी यांची प्रतिनियुक्ती ( क्रीम पोस्टिंग ) केली होती.

जिथे मेवा मिळतो तेथे मेवा घेऊन ही प्रतिनियुक्ती देण्यात आली होती, एका प्रतिनियुक्तीसाठी किती रक्कम घेण्यात आली याची देखील जिल्हा परिषदेच्या आवारात दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे, प्रतिनियुक्ती तसेच बदल्या प्रकरणात मोठा घोळ सुरू असून आलेल्या लाचेच्या रकमेवरून दोन कर्मचाऱ्यात कार्यालयातच फ्री स्टाईल हाणामारी झाल्याचेही पहावयास मिळाले आहे.

दरम्यान प्रतिनियुक्ती / सेवा वर्ग केलेल्या वैद्यकीय अधिकारी/ कर्मचारी यांचे सेवा वर्ग / प्रतिनियुक्ती आदेश रद्द करून मूळ पदस्थापनेवर सेवा परत करण्याचा आदेश लातूरच्या आरोग्य उपसंचालक डॉक्टर कमल चामले यांनी देऊनही उस्मानाबादच्या  जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी एकाही कर्मचाऱ्यांस मूळ पदावर न पाठवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

baba maske

Related Post

कानडी रोडकडे दुर्लक्ष? नागरिकांचा संताप; पुढाऱ्यांवर सवाल यश कन्स्ट्रक्शन कंपनी व सार्वजनिक बांधकाम विभागाने या भागाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले?
केज नगरपंचायत घरकुल घोटाळा  अखेर घोटाळेबाज अधिकाऱ्यांवर केज ठाण्यात फिर्याद दाखल परवानगीपूर्वीच मुख्याधिकाऱ्यांची घाई; प्रश्नचिन्ह उपस्थित
केज नगरपंचायत घरकूल घोटाळ ठेकेदारांकडून कोट्यवधींची वसुली; मिलिंद सावंत, नीता अंधारेसह अधिकाऱ्यांवर फौजदारीची टांगती तलवार! चार कोटींच्या नियमबाह्य वितरणाचा भंडाफोड; चौकशी समितीचा अहवाल अंतिम टप्प्यात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!