• Fri. Jun 5th, 2026

केजचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांची तलवाडा ता.गेवराई आणि संतोष मिसळे यांची अंबाजोगाई ग्रामीण येथे बदली.उद्या पो.नि.शंकर वाघमोडे यांचा सकाळी 10 वाजता निरोप समारंभ.

Bybaba maske

Feb 6, 2023

केजचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांची तलवाडा ता.गेवराई आणि संतोष मिसळे यांची अंबाजोगाई ग्रामीण येथे बदली.उद्या पो.नि.शंकर वाघमोडे यांचा सकाळी 10 वाजता निरोप समारंभ.

रोखठोक न्युज 

 केज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे यांच्या केज येथून बदल्या झाल्या आहेत.

या बाबतची माहिती अशी की, ऑगस्ट २०२१ मध्ये तात्कालीन पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या बदलीने रिक्त झालेल्या जागी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी पदभार स्वीकारला होता. त्यांच्या काळात त्यांनी जनता, पत्रकार व पोलीस यांच्यात खूप चांगले संबंध निर्माण केले. तसेच गुन्हेगारी रोखणे आणि त्या बाबतीत जनामन्यात जनजागृती करण्यात ते अग्रेसर होते. त्यांच्या कार्यकाळ गुन्हयाचा तपास देखील चांगला होता. शंकर वाघमोडे यांचे कर्मचाऱ्यांशी देखील खूप चांगले संबंध होते आणि गुन्हेगारीवर त्यांचा वचक होता. सर्वांशी अत्यंत मिळून मिसळून सर्वांशी प्रेमाने वागणारे ते पोलीस अधिकारी होते. त्यांची गेवराई तालुक्यातील तलवडा पोलीस ठाण्यात बदली झाली आहे.

तर दुसरे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे हे अत्यंत मितभाषी परंतु गंभीर गुन्ह्यांच्या तपासात अत्यंत हुशार अधिकारी होते. संतोष मिसळे हे मागील चार वर्षा पासून केज येथे कार्यरत होते. त्यांचा पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्याशी खूप जिव्हाळ्याचा संबंध आहे. संतोष मिसळे यांची अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात बदली झाली आहे.

केज पत्रकारांच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे या दोघांना शुभेच्छा.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!