केज नगरपंचायत चे नगरपरिषदेत रूपांतर होण्याच्या हालचालींना शासन स्तरावर आला वेग…
रोखठोक न्युज वार्ताहर
अकृषिक रोजगाराच्या टक्केवारीच्या कागदपत्रासह सुधारित व सद्यस्थितीदर्शक प्रस्ताव, ठोस समर्थनासह या कार्यालयास तात्काळ सादर करण्याचे आदेश.
केज (प्रतिनिधी) बीड जिल्ह्यातील महत्वाची आणि अनेक दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठेची असलेली नगर पंचायत आता नगर परिषदेत रूपांतर होण्याच्या प्रकरणाला आता चांगलाच वेग आल्याचे दिसून येत आहे. दोन राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या केज नगरपंचायतीत अजुन तरी येतील मतदारांना गोड बोलून सत्ता मिळवणाऱ्या राजकीय बांडगुळांना हवा तसा विकास करता आला नसल्याने शासन स्तरारून मात्र नगर पंचायतीचे नगर परिषदेत रूपांतर होण्याच्या हालचालींना वेग आला आहे व असे पत्र देखील येथील मुख्याधिकारी यांना आले आहे.
१. उप सचिव, नगर विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांचे पत्र अ.शा.पत्र क्र.- एमयुएम-२०१२/प्र. क्र. १८८/नवि-१७ दिनांक:-०२ नोव्हेंबर २०२२. २. या कार्यालयाचे पत्र क्र. २०२२ जीबी/डेस्क- १/एमयुएन/ ५५२२ दिनांक ०७.१०, २०२२ ३. मुख्याधिकारी, नगरपंचायत केज यांचा अहवाल जा.क्र. २०२२ /नप/ १३८२, दिनांक: १०.१०.२०२२ ४. या कार्यालयाचे पत्र क्र. २०२२ / जीबी / डेस्क- १/एमयुएन/ ६५१५, दिनांक १६.११.२०२२ ५. उप सचिव, नगर विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांचे पत्र अ.शा.पत्र क्र.- एमयुएम-२०१९/प्र.क्र. १८८/नवि-१७ दिनांक:-३० जानेवारी, २०२३.उपरोक्त संदर्भीय विषयांकित प्रकरणी संदर्भ क्र. २ अन्वये श्रीमती नमिता अक्षय मुंदडा, मा. विधानसभा सदस्य, केज विधानसभा मतदार संघ, जिल्हा बीड यांचे मा. उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या दिनांक २८.०८, २०२२ रोजीच्या निवेदनाची प्रत स्टेबल जोडण्यात आलेली आहे. सदर निवेदनावर मा. उपमुख्यमंत्री यांनी ‘तपासून कार्यवाही करावी” असे निदेश दिलेले आहेत. तरी प्रकरणी केज नगरपंचायतीचे नगरपरिषदेमध्ये रुपांतर करण्यासंदर्भात, अकृषिक रोजगाराच्या टक्केवारीच्या कागदपत्रांसह सुधारित सद्यस्थितीदर्शक प्रस्ताव, ठोस समर्थनासह शासनास सादर करण्याबाबत संदर्भाधीन शासन पत्रान्वये कळविण्यात आले आहे. सदरील प्रस्ताव शासनास अद्याप प्राप्त झालेला नाही. करिता [केज नगरपंचायतीचे नगरपरिषदेमध्ये रुपांतर करण्यासंदर्भात, अकृषिक रोजगाराच्या टक्केवारीच्या कागदपत्रासह सुधारित व सद्यस्थितीदर्शक प्रस्ताव, ठोस समर्थनासह या कार्यालयास तात्काळ सादर करावा. जेणेकरून पुढील कार्यवाही करणे सोपे होईल असे कळविण्यात आले होते.तथापी संदर्भ क्र. 3 अन्वये आपण सादर केलेल्या अहवालामध्ये मा. जिल्हा सांख्यिकी अधिकारी बीड यांचे कडून प्राप्त बीड जिल्ह्याधी अकृषिक रोजगाराच्या टक्केवारी बाबत माहिती सादर केल्याचे निदर्शनास येते. सदरील माहिती तथा आपल्या अवालावरून केज नगरपंचायत क्षेत्रातील अकृषिक रोजगाराच्या टक्केवारी बाबत स्पष्ट उल्लेख /अभिप्राय निदर्शनास येत नाही. करिता कामी केज नगरपंचायतीचे नगरपरिषदेमध्ये रूपांतर करण्यासंदर्भात, अकृषिक रोजगाराच्या टक्केवारीच्या सुधारित व सदयस्थितीदर्शक प्रस्ताव, ठोस समर्थनासह या कार्यालयास तात्काळ सादर करावा. जेणेकरून पुढील काम करणे सोपे होईल.