दलित पँथर मनोजभाई संसारे यांचे निधन.
रोखठोक न्युज वार्ताहर
दलित चळवळीचा तारा निखळला,मनोजभाई संसारे एक लढवय्या, झुंजार, नामांतर मध्ये ज्या वेळेस दलित चळवळ मध्यावर आली होती त्या वेळेस हा हिरा दलित पँथर ला मिळाला आणि आल्पवधितच आपल्या भाषणाने,निडर पणाने लोंकाच्या गळ्यातील ताईत बनला.मुंबई येथील वडाळा, लालबाग मध्ये भाई म्हणचे आंबेडकर चळवळीच केंद्र झाले होते.
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष मनोज भाई संसारे यांचे दुःखद निधन झाल्याची बामती समजली त्याच क्षणी हृदय हेलावून गेलं आंबेडकरी चळवळीतील वादळ शमलं आंबेडकरी चळवळीचं एक लढवय नेतृत्व गमावलं असून भाईच्या दुःखद निधनामुळे चळवळीची मोठी हानी झाली आहे.
डाॅ बाबासाहेब आंबेडकर च्या महानिर्वाण दिवशी प्रत्येक 6 डिसेंबर ला दादर येथे भारतातून येणाऱ्या प्रत्येक चळवळीतील कार्यकर्त्याला जेवण खाऊ घातल्या शिवाय परतू देत नसे असे आज मनोजभाई भाई संसारे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.आज कित्येक अनुयायी पोरके झाले.अखेर चा जयभीम पॅंथर..!!
