औरंगाबाद खंडपीठाकडून केंद्रेकरांचा अर्ज न स्वीकारण्याचे आदेश; केद्रेकर माघार घेणार ?
महेश जगताप मुंबई प्रतिनिधि
औरंगाबाद चे विभागीय आयुक्त धडाकेबाज अधिकारी म्हणून राज्यात ओळखल्या जाणाऱ्या सुनील केंद्रेकरांनी मोठा निर्णय घेतला असून केंद्रेकरांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज दि २४व २६/५/२०२३ रोजी ऱाज्य शासनाकडे दाखल केला होता. सध्या विभागीय आयुक्त म्हणून कार्यरत असलेले सुनील केंद्रेकर यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज दाखल केल्याने खळबळ उडाली होती. तर त्यांनी हा निर्णय का घेतला? याबाबत अनेक चर्चांना उधाण आलं आहे. तर औरंगाबाद खंडपीठाकडून केंद्रेकरांचा अर्ज न स्वीकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या दरम्यान आज श्री.नितीन गद्रे अप्पर मुख्य सचिव (सेवा) यांनी आज दि २७/६/२०२३ रोजी भारतीय प्रशासन सेवेतुन स्वेच्छा सेवानिवृती घेण्यास मान्यता दिली असल्याचे अ.शा.प्र.क एईओ-१०२३प.क्र २५८(१०)२०२३ सामान्य प्रशासन विभाग मुबई -३२ पत्रान्वये अप्पर मुख्य सचिव (महसुल व नोंदणी मुद्राक शुल्क) यांच्या सल्ल्याने दि ३/७/२०२३ रोजी मध्यणपुर्वी वेळी अन्य अधिकारी यांचेकडे पदभार स्विकारण्याचे कळवले आहे.अधिकाराचा वापर जनतेच्या भल्यासाठी आणि हक्कासाठी करणारा खमक्या अधिकारी म्हणून राज्यात ओळख असलेल्या सुनील केंद्रेकरांनी स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज दाखल केल्यानंतर केंद्रेकरांच्या कार्यपद्धतीवर प्रेम करणाऱ्या अनेकांना धक्का बसला. परंतू मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने केंद्रेकरांचा स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज न स्विकारण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या या आदेशामुळे अशी घटना बहुतेक पहिल्यांदाच घडली असावी याचा परिचय महाराष्ट्राला झाला.विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी शासनाकडे गेल्या महिन्यात व्हीआरएससाठी अर्ज केला होता. मात्र त्यांच्या या निर्णयावर न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. केंद्रेकरांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी दिलेला अर्ज सरकारने स्वीकारू नये, असा आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. मार्च २०२४ पर्यंत स्वेच्छानिवृत्तीसाठी दिलेला अर्ज स्वीकारू नयेत, असेही न्यायालयाने म्हटले आहे. कारण कोर्टाने छत्रपती संभाजीनगर शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठी नेमलेल्या समितीवर केंद्रेकरांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे मार्च २०२४ पर्यंत ही योजना अंतिम टप्प्यात आली असेल, तोपर्यंत अर्ज स्वीकारू नये असे खंडपीठाने आपल्या आदेशात म्हटले आहे.राज्यातील काही मोजक्या धडाकेबाज आयएएस अधिकाऱ्यांच्या यादीत केंद्रेकरांच्या नावाची नेहमी चर्चा असते. विक्रीकर सहआयुक्त, प्रभारी जिल्हाधिकारी, बीडचे जिल्हाधिकारी, सिडकोचे मुख्य प्रशासक, प्रभारी मनपा आयुक्त आणि आता विभागीय आयुक्त पदावर त्यांनी काम केले आहे.सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी कठोर भूमिका घेण्यात केंद्रेकर नेहमी चर्चेत राहिले आहेत. बीडचे जिल्हाधिकारी असताना त्यांची बदली झाली आणि अख्खा बीड त्यांची बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरला होता. शेतकरी कुटुंबातून आलेल्या केंद्रेकरांनी नेहमीच शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या उपयोजना राबवण्याचा प्रयत्न केला. मात्र अशा धडाकेबाज आयएएस अधिकाऱ्याने अचानक व्हीआरएस घेतल्याने त्यांनी हा निर्णय का घेतला असावा याचे उत्तर मात्र अजूनही मिळाले नाही.
या प्रकरणी विभागीय आयुक्त सुनिल केंद्रकर स्वेच्छा निवृत्तीच्या निर्णयावर ठाम राहतात की न्यायालयाच्या सुचना/आदेशाचे पालन करून निर्णय मागे घेतात हे येणाऱ्या काही दिवसात कळेल.