14 वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार; पीडीतेच्या चूलत भावाची न्यायासाठी महिला आयोगा कडे तक्रार.
रोखठोक न्युज वार्ताहर
बीड अल्पवयीन 14 वर्षीय मुलीवर पाच ते सहा नराधमांनी सतत – सामूहिक लैंगिक अत्याचार केला यातून पीडिता साडेसहा महिन्याची गर्भवती राहिली. गर्भपात करावा यासाठी अत्याचार करणारांनी पीडीतेसह तिच्या आई-वडिलांनाही गायब केल्याची तक्रार पीडितेच्या चुलत भावाने राज्य महिला आयोगाकडे करून न्याय देण्याची मागणी केली आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर खळबळ माजली आहे.
बीड तालुक्यातील खा. पांगरी येथे 14 वर्षीय मुलीवर पाच ते सहा नारामांनी सातत्याने सामूहिक लैंगिक अत्याचार केला असल्याचा दावा पीडीतेच्या चुलत भावाने राज्य महिला आयोगाला पाठवलेल्या पत्रात केला आहे. अत्याचारातून पीडीता साडेसहा महिन्याची गर्भवती राहिली. ही बाब नराधमांना समजल्यानंतर त्यांनी पीडितेच्या आई-वडिलांना धमक्या देऊन दबाव टाकत गर्भपात करण्यास सांगितले. गर्भपात न केल्यास जीवे मारण्याची धमकी देखील दिली. याबरोबरच पीडितेसह तिच्या आई- वडिलांना अज्ञातस्थळी नेऊन ठेवले असल्याचं पत्रात म्हटलं आहे. नराधमांनी बळजबरीने पीडितेचा गर्भपात केल्यास तिच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो तसेच नातलगांच्या जीवाला देखील धोका निर्माण झाला आहे. याप्रकरणी पिडीतेसह तिच्या आई वडिलांचा शोध घेऊन नराधमाविरोधात बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्याचे आदेश बीडच्या पोलीस अधीक्षकांना देऊन आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी पीडितेच्या चुलत भावाने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. या प्रकरणाने खळबळ उडाली आहे.