• Wed. Jun 3rd, 2026

राष्ट्रवादीच्या नगरसेवकच्या मुलाने केली सत्तर वर्षीय वृद्ध महिला व तिच्या मुलाला मारहाण

Bybaba maske

Jun 30, 2023

राष्ट्रवादीच्या नगरसेवकच्या मुलाने केली सत्तर वर्षीय वृद्ध महिला व तिच्या मुलाला मारहाण

रोखठोक न्युज वार्ताहर 

 केज नगर पंचायतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविकेच्या मुलाने व त्याच्या साथीदाराने एका ७० वर्षाच्या वृद्ध महिलेस व तिच्या मुलाला मारहाण केली आहे.

या बाबतची माहिती अशी की, केज येथील पार्वती भानुदास उकाडे व यांचे पती भानुदास उकाडे हे केज येथे राहतात. त्यांचा एक मुलगा परदेशी असून एकजण पुण्यात असतो.

दरम्यान दि. २९ जून रोजी केज येथील अहिल्यादेवी नगरच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सोजरबाई शिवाजी गाढवे यांचे चिरंजीव बाळासाहेब गाढवे व दिगांबर दत्तात्रय निंगुळे हे दोघे उकाडेहे दोघे त्यांच्या घराजवळ आले. ते दोघे पार्वती उकाडे यांचे अतिक्रमण हटविताना निघालेल्या भिंतीच्या जुन्या विटा घेऊन जाऊ लागले. तेव्हा पार्वतीबाई त्यांना वीटा घेवुन जावु नका असे म्हणाल्या. तसे म्हणताच राष्ट्रवादी नगरसेविका सोजरबाई गाढवे यांचा मुलगा बाळासाहेब गाढवे याने त्यांना चापटा बुक्याने मारहाण केली. तेवढ्यात त्यांचा मुलगा सतिश हा भांडण सोडवण्यासाठी तेथे आला आणि त्याने त्याच्या आईला का मारता ? असे विचारले म्हणून बाळासाहेब गाढवे याचे सोबत असलेला दिगंबर निंगुळे याने खिळा असलेल्या पट्टीने सतीश उकाडे याच्या उजव्या हाताच्या बोटावर व डाव्या हाताच्या बोटावर मारुन जखमी केले. बाळासाहेब गाढवे याने तू वृद्ध महिला व त्यांचा मुलगा सतिश यांना शिवीगाळ करुन जिवे मारुन टाकण्याची धमकी दिली.

या प्रकरणी पार्वती उकाडे यांच्या तक्रारी वरून केज पोलीस ठाण्यात नगरसेविका सोजरबाई गाढवे यांचा मुलगा बाळासाहेब गाढवे व दिगंबर निंगुळे यांच्या विरुद्ध गु. र. नं. ३८०/३२३ भा. दं. वि. ३२३, ३२४, ५०४, ५०६ व ३४ नुसार गुन्हा दाखल झाला आहे.पुढील तपास केज पोलीस करत आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!