दुग्धशर्करा योगा मुळे धनंजय मुंडे यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा.विष्णु चाटे.
रोखठोक न्युज वार्ताहर
15 जुलै हा नवनिर्वाचित कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचा वाढदिवस.काहि दिवसापुर्वी अजित पवार हे महाराष्ट्र सरकार मध्ये सामील झाले व लगेच राष्ट्रवादी कॉग्रेस च्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतली त्या नंतर आपल्या बालेकिल्ल्यात आलेले धनंजय मुंडे यांचे बीड जिल्ह्य़ातील जल्लोषात स्वागत झाले.त्यानंतर त्यांचा वाढदिवसच्या आगोदर त्याना महत्वाचे असे कृषी खाते मिळाले त्यामुळे कार्यकर्त्याचा आनंदाचा उत्सव साजरा केला.आज राष्ट्रवादी काँग्रेसचे केज तालुका अध्यक्ष विष्णु चाटे व त्यांच्या संपूर्ण टिम व कार्यकर्त्याने आपल्या धनुभाऊचा वाढदिवस तालुक्यात वेगवेगळे उपक्रम राबवून साजरा केला.या वेळेस बोलताना तालुकाध्यक्ष विष्णु चाटे यांनी हा आमच्या साठी दुग्धशर्करा योग्य आहे.त्या मुळे हा आंनदाचा डबल डोस आम्ही तालुक्यात उत्साहात साजरा केला असे सांगीतले.