केज धारूर रोड वर साने गुरूजी आश्रम शाळे जवळ अपघात झाला असुन त्यात रामभाऊ सदाशिव घुले,वय 40 याचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाले आहे.केज धारूर रोडवर MH 10 B7007 ही बोलेरो चारचाकी गाडी केज च्या दिशेने भरधाव वेगात जात होती.बोलेरो ने MH 44 R 9075 या दुचाकीस धडक दिली. त्यांची समोरासमोर धडक झाली त्यात रामभाऊ घुले टाकळी ता.केज जि.बीड हे जागीच ठार झाले तर त्याच्या सोबत चा गंभीर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथे हलवले आहे.तर रामभाऊ घुले यांना उपजिल्हा रुग्णालय केज येथे शवविच्छेदन साठी ठेवले आहे.